Home घुग्घुस रेल्वे फाटकाजवड वाहतुकीस कोंडी निर्माण होत असल्यामुळे राजीव रतन उड्डाण पुलाचे काम...

रेल्वे फाटकाजवड वाहतुकीस कोंडी निर्माण होत असल्यामुळे राजीव रतन उड्डाण पुलाचे काम लवकरात लवकर शासनाने पूर्ण करावे – नागरिकांची मागणी

0
189

गणेश शेंडे शहरं प्रतिनिधी, घुग्घुस

मागिल अनेक वर्षापासून घुग्घुस येथील राजिव रतन जवळ नव्याने सुरू असलेल्या उड्डाण पूल सूरू असल्या मुळे या ठिकाणी नेहमी वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे व सोबतच या नेहमी रेल्वे गाड्या पाच-पाच मिनिटांत जात असल्यामुळे हजारो वाहनाच्या रांगा या ठिकाणी लागत असतात व त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होताना दिसत आहे. व या ठिकाणी नेहमी अपघात सुद्धा झालेले आहे किंबहुना काही लोकांना आपला जीव गमवावा लागला काही लोकांचे हात पाय सुद्धा तुटले काही लोकांना गंभीर झाली परंतु आतापर्यंत प्रशासनाची झोप उघडली नाही या पुलाचे बांधकाम प्रशासनाने लवकरात लवकर करून जनतेसाठी हा पूल मोकळा करून द्यावा अशी येथील समस्त घुगुसवासीय नागरिकांची शासन आणि प्रशासनाला मागणी आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here