आकाशाची उंची मोजाया नाही कुठलेही माप
तुझ्या आणि माझ्या प्रीतीतही अशीच प्रीत आहे अमाप
नाही कळले कधी न वळले होईल दुरी या प्रीतीत
पण सांगायाला शब्दच नाही अशी आहे आपली जोडी समिप
कधी न केली शब्दांची देवानघेवान तरीही ही प्रीत फुलली हृदयी आपल्या सप्तसुरांत
नव्हती काही आशा तरीही होता हृदयासमिप
काळ झाला वैरी सख्या तुटलो जणू ताऱ्यांप्रमाणे नभातून जमिनीवर
आहे प्रीत म्हणूनच काळजाच्या समीप केले वास्तव्य
जरी असतील नागमोडी अंधाऱ्या वाटी तरी तू आहे वळणाच्या प्रत्येक वळणावर साथ
अशीच आहे तुझी अन माझी प्रीत समीप
अशीच आहे तुझी आणि माझी प्रीत समिप
रंजना भैसारे, नागपूर

