‌छात्रध्यापक विद्यार्थीनींनी जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास संपादन करून परिक्षेत नाव लौकिक करावे – पी. बी. फुंडे

0
54

महिला अध्यापक महाविद्यालयात निरोप समारंभ

जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674

भंडारा – महिला शिक्षिका हया विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारे शिल्पकार आहेत. यशाचे शिखर गाठण्यासाठी विद्यार्थीनींनी मोठे स्वप्न पाहुन मेहनत घ्यावी. महिला अध्यापक विद्यालयाच्या छात्रध्यापिकांनी शैक्षणिक गुणवत्ता व शिस्त प्रियतेचे आणि शिक्षण पध्दतीचे भान ठेवणे आवश्यक आहे. सौंदर्य दृष्टी वाढीस लावणे, सृजनशीलता, नवनिर्माण क्षमता निर्माण करावे. स्पर्धेच्या युगात वावरत असतांना सखोल अभ्यासाची कास धरावी. त्याकरिता छात्रध्यापक विद्यार्थीनींनी जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास आत्मसात करून परिक्षेत नाव लौकिक करावे असे प्रतिपादन महिला शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक पी. बी. फुंडे यांनी केले.ते महिला शिक्षण प्रसारक मंडळ भंडारा द्वारा संचालित महिला ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन येथील निरोप समारंभ कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक पी. बी. फुंडे होते. प्रमुख अतिथी म्हणून महिला शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश खोकले, सचिव संजय गुप्ते, कोषाध्यक्ष युगकांता रहांगडाले, संचालिका शुभांगी ऋषी, संचालक रामदास शहारे, चेटूले, सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर, बेसिक उच्च प्राथ. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अल्का पटोले, प्राचार्य वर्षा चांदेकर व पदाधिकारी तसेच महिला अध्यापक महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते विद्येची आराध्य देवता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जून २०२३-२४ मध्ये डिएलएड प्रथम वर्षात प्राविण्य प्राप्त केलेल्या निलिमा काळे व कविता चव्हाण या विद्यार्थिनींना भेट वस्तू व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

महिला शिक्षण प्रसारक मंडळाचे नाव महाराष्ट्रातील नामांकित व प्रतिष्ठित संस्थेपैकी एक आहे. महिला अध्यापक महाविद्यालयातील विद्यार्थीनींनी यशाचे शिखर गाठण्याची परंपरा नेहमी जोपासावी. त्यातच शैक्षणिक गुणवत्ता, शिस्त प्रियतेचे व शिक्षण पध्दतीमुळे महाविद्यालय नावारूपाला आले आहे. असे मत महिला शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका शुभांगी ऋषी यांनी केले. अनेक विद्यार्थिनींनी महाविद्यालयातील जुन्या आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांनी विविध मार्मिक उदाहरण देऊन विद्यार्थीनींना प्रोत्साहन देऊन परिक्षेच्या शुभेच्छा देत मार्गदर्शन केले.

शेवटी डिएलएड व्दितीय वर्षाच्या विद्यार्थिनींनी प्राचार्या वर्षा चांदेकर व प्राध्यापक वर्गाला भेट वस्तू म्हणून आकर्षक पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. त्यावेळी प्रा. गणेश किरसान, प्रा. विनोद चव्हाण, संजय खुणे, जिजामाता विद्यालयाचे प्राचार्य धनराज बारस्कर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काजल बुजाडे व प्रा. विनोद चव्हाण यांनी केले तर प्रास्ताविक प्राचार्य वर्षा चांदेकर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार वैष्णवी राखे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मनोज टेकाम, सरिता लोंदासे, प्रतिक्षा मारबते, रूषाली राघोर्ते, कोमल सहकाटे, सिमा पवनकर, साक्षी मेश्राम, सानिया मस्के, स्नेहा शेंडे, पायल एंचिलवार, ममता उताणे, आरती घोनमोडे, प्राची ढोमणे, आकांक्षा भुरे, आचल शेंडे, सृष्टी मोटघरे, सोनाली लांजेवार, डिंपल मांदाळे, सायली मस्के, वैष्णवी गिदमारे, प्रिया सेलोकर, रविना कांबळे, पल्लवी गभणे, अर्चना नेवारे, श्रृती डहाके, साक्षी धांडे, कविता चव्हाण, करिष्मा चोले, सानिका इंदुलकर, रूचिता धुर्वे, जान्हवी कठाणे, कोमल ठवकर, अश्विनी बनकर, शुभांगी गाडेकर व महिला ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन येथील शिक्षकेत्तर कर्मचारी, छात्रध्यापक विद्यार्थिनींनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here