आहे प्रीत वेडी.. बावरी राधिका मी…
आहेस तु प्रिया माझा …
सखा मनोहर तू…
भेटता तुला अशी मी… रंगले तुझ्या रंगात मी…
विसरले देहभान ही… एकरूप असे दोघेही….
राहू दे ना अशीच साथ तुझी…
चालत राहू असेच कायम सोबत…
घेऊन तुझे माझे….क्षण मखमली….
जपून ठेवूया ना हे… अलवार अस काही…
मनाच्या शिंपल्यात….
तुझ्या माझ्या प्रीती चे…. मोती….
तुझ्या माझ्या प्रीती चे मोती….
आशालता भोसले
इंदापूर पुणे जिल्हा

