आतंकवाद्यांची पाक मधील 9 कॅम्प उध्वस्त
भाजपा कार्यकर्त्यांनी केला जल्लोष
चंद्रपूर :- पहलगाम येथे भारतीय नागरिकांवर हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी अतिरेक्यांना भारतीय सैन्याने मंगळवारी(दि6) मध्यरात्रीला चोख प्रत्युत्तर दिले. या यशस्वी कारवाईसाठी सैन्याच्या शौर्याला सलाम करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय सैनिकांनी दाखविलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.भारताने चोख उत्तर देत आतंकवाद्यांची पाकिस्तान मधील 9 प्रमुख स्थाने उध्वस्त केली.याचे स्वागत करीत भारतीय जनता पार्टीने येथील बुधवारी(दि 7)सायंकाळी जटपुरा गेट येथे जल्लोष केला.लोकनेते आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात जल्लोष कार्यक्रमाचे आयोजन भाजपा जिल्हाध्यक्ष(श)राहुल पावडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले.यावेळी भारतीय जनता पार्टी महानगर अध्यक्ष राहुल पावडे,रामपाल सिंग, सविता कांबळे, अनिल फुलझेले,शिला चव्हाण,संदीप आगलावे, रवी लोणकर, दिनकर सोमलवार, सचिन कोतपलीवार, अजय सरकार, रवि चहारे,चाँद सय्यद,नम्रता ठेमसकर,राजेंद्र खांडेकर, मधुकर राऊत, चंदन पाल,वंदना संतोषवार, उमेश आष्टकर, सुनील डोंगरे,प्रमोद क्षीरसागर, प्रलय सरकार,संदीप सदभैया, आकाश मस्के, आकाश ठुसे, विठ्ठल डुकरे,बंडू गोरकार ,सुनीता अग्रवाल, बाळू कोलनकर, पूनम तिवारी मुन्ना अटलम, कैलास संगेवार,दिपक ननेट, वर्षा सोमलकर, सुप्रिया सरकार,उमेश खोब्रागडे, सचिन बोबडे,अमोल मते, भावना जोसेफ, स्मिता दानी,यांची उपस्थिती होती.

