आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या वारसांना शासकीय धनादेशाचे तहसीलदार किशोर यादव यांच्या हस्ते वितरण

0
87

श्रीक्षेत्र माहूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – माहूर तालुक्यातील मौजे शेख फरीद वझरा येथील अल्पभूधारक शेतकरी गोमा काळू चव्हान यांनी दिनांक 12 8 2024 रोजी कर्जाचा चिंतेने आत्महत्या केली होती त्याची संपूर्ण कागदपत्रे शासन दरबारी पाठवून तहसीलदार किशोर यादव यांनी दिनांक 8 5 2025 रोजी मयताच्या वारसांना एक लाख रुपयाचा धनादेश दिल्याने मयताची पत्नी श्रीमती मंगलाबाई चव्हाण यांनी गहिवरलेल्या अवस्थेत धनादेश स्वीकारत शासनासह तहसिलदार किशोर यादव यांना धन्यवाद दिले.

माहूर तालुक्यात कर्जबाजारीपणामुळे भरपूर आत्महत्या झालेल्या आहेत शासनाचा मदत निधी मिळविण्यासाठी मयतांच्या वारसांना अनंत अडचणी येतात त्यामुळे अनेक प्रकरणे रखडली असून सर्वच शेतकऱ्यांना शासनाकडून कर्जमाफीची अपेक्षा व्यक्त होत आहे माहूर तालुका आधीच कोरडवाहू असून येथे ओलिताची सोय नसल्याने 90 टक्के शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावरचे पिकावरच अवलंबून राहावे लागते त्यामुळे येथे आत्महत्याच्या संख्येत यावर्षी वाढ झालेली आहे.

यावेळी नायब तहसीलदार डॉ राजकुमार राठोड नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन शाखेचे सहाय्यक महसूल अधिकारी एच व्हीं कुलदीपके पवनाळा चे सरपंच इंदल राठोड कुपटीचे माजी सरपंच पवन बुरकुले भाजपाचे तालुका उपाध्यक्ष अजय पवार शेतकरी नेते अविनाश टनमने संदीप टनमने यांचे सह मयत शेतकऱ्याचे वारसदार आणि मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here