प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – आई-वडिलांबद्दल जेवढ बोलावं तेवढं कमी पडेल. पण मी या लेखात थोडफार बोलून व्यक्त होते. आई-वडील मुलांना जन्म देतात. लाहाण्याचे मोठे करतात. चांगले संस्कार देतात. त्यांना खूप शिकवतात. प्रत्येक आई-वडिलांना वाटत असते की, आपल्यावर जी परिस्थिती आली, ती आपल्या मुलांवर येता कामा नये. म्हणून ते एवढी धडपड करतात.आई वडील खूप संघर्ष करून आपल्या लेकरांना शिकवतात. प्रत्येक आई-वडिलांच्या डोळ्यात एकच स्वप्न असते की, आपला मुलगा किंवा मुलगी खूप मोठं काहीतरी व्हावं. आणि हे सहाजिक आहे, मुलांना देखील हे कळलं पाहिजे की आपले आई-वडील आपल्यासाठी किती धडपड करतात. याची जाणीव मुलांना कळली पाहिजे. मुलांना स्वतःसाठी नाही तर आई-वडिलांसाठी मोठं झालं पाहिजे. मुलांना आपल्या आई-वडिलांच्या संघर्षाचं चीज केलं पाहिजे. मुलं मोठी झाली आणि स्वतःच्या पायावर उभी झाली की आई वडील त्यांचे लग्न लावून देतात. मग मुलं आपल्या प्रपंचाला लागले की नंतर तेच मुलं आपल्या आई-वडिलांशी संपत्ती बद्दल भांडू लागतात. हे चुकीचं आहे ना. असं नाही केलं पाहिजे.आपण हा विचार करत नाही की, आपण त्यांच्याशी असं वागलो तर त्यांचं मन किती दुखेल. मी प्रत्येक तरुण पिढीला सांगू इच्छिते की, संपत्तीसाठी भांडण्या पेक्षा आई-वडिलांच्या सेवेकरिता भांडा. मग जग तुमच कौतुक करेल. कारण जग गोल आहे. तुम्ही आज तुमच्या आई-वडिलांसोबत जशी वागता, तसेच तुमचे देखील मुलं तुमच्याशी वागतील. म्हणून भांडायचं आहे तर त्यांच्या सेवेकरिता भांडा. ही संपत्ती वगैरे काहीच नसते. आई वडीलच आपली सगळ्यात मोठी संपत्ती आहे. तुम्हाला आई-वडिलांविषयी प्रेम बघायचं असेल तर ,तुम्ही त्या अनाथ- आश्रमा मध्ये जाऊन बघा. ती मुले आई-वडिलांच्या प्रेमासाठी व्याकुळ झालेली असतात. कारण त्यांच्याजवळ आई-वडीलच नसतात. ते बिचारे अनाथ असतात. अस म्हणतात की, कुठलीही गोष्ट किंवा व्यक्ती आपल्या जवळ असली की त्याची किंमत आपल्याला नसते, मग ती दुरावली की तेव्हा आपल्याला त्याची जाणीव कळते.काही काही मुलं आई वडिलांना असे देखील म्हणतात की, तुम्ही आमच्यासाठी काय केलंय? अरे मी तुम्हाला सांगते की आई वडील जन्म दिले हीच तर मोठी गोष्ट आहे. तेच तर तुम्ही पुण्य समजा.कारण ते होते म्हणून आज तुम्ही इथपर्यंत आले याची जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे. मुलांना आई-वडिलांचा आदर ,प्रेम ,सन्मान ,सगळं केलं पाहिजे. आई-वडील आपल्यासाठी नाही तर आपण आई-वडिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे.
नुकतीच एक हृदयस्पर्शी घटना साताऱ्या जिल्ह्यात घडली. वयोवृद्ध झालेल्या आई-वडिलांची सेवा करायला “मोठा भाऊ लहान भावाला संधीच देत नाही. लहान भावाने मोठ्या भावाबद्दल न्यायालयात दावा ठोकला”. म्हणजे यातून शिकण्यासाठी खूप काही आहे. अशी मुलं प्रत्येक आई-वडिलांच्या पोटी जन्माला आले पाहिजे. मग कुठल्याच आई वडिलांना वृद्धाश्रमाची गरज पडणार नाही. अरे म्हातारपणात वृद्धाश्रमाची गरज नसते तर, तुमच्या प्रेमाची गरज असते. कारण म्हातारपण हे बालपण असते ना. तुम्ही आज तुमच्या आई-वडिलांच्या मातारपणात त्यांची सेवा केले तर, तुम्ही म्हातारे झाल्याच्या नंतर तुमचे मुलं देखील तुमची सेवा करतील.मग हे जग कुठल्या कुठे जाईल आपल्याला कळणार सुद्धा नाही. मुलांनी असं काम केलं पाहिजे की आई-वडील म्हणाले पाहिजे की ,आम्ही यांची मायबाप नाही तर ,हा माझा लेकरू आहे.
मी सांगते तुम्हाला आम्ही देखील तीन बहिणीच आमच्या आई वडिलांना आहोत .पण आम्ही हे असं कधीच वागणार नाही. कारण आमची सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजेच आमचे आई वडील आहेत आमच्यासाठी. आम्हाला हे काही नको धन, दौलत ,पैसा, संपत्ती फक्त त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचं आहे. कारण आमचे धन, दौलत , संपत्तीच आमचे आई वडील आहेत…
कु.सिद्धी भास्कर बनसोड
कुरखेडा,गडचिरोली

