prabodhini news logo
Home चंद्रपूर टेट (TAIT) परीक्षेच्या कालावधीत पूर्वनियोजित एमपीएससी, यूपीएससी परीक्षा, टेट परीक्षा 1 महिना...

टेट (TAIT) परीक्षेच्या कालावधीत पूर्वनियोजित एमपीएससी, यूपीएससी परीक्षा, टेट परीक्षा 1 महिना पुढे ढकलण्याची मागणी – सिद्धांत पुणेकर

0
230

प्रणित तोडे चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षेच्या ऑनलाईन अर्ज भरण्यात दिनांक 14 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही परीक्षा 24 मे ते 5 जून दरम्यान घेण्यात येणार आहे. शिक्षण क्षेत्रात नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारासाठी एक महत्त्वाची संधी असून बी.एड. आणि एम. एड. अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात असेलेले किंवा अंतिम परीक्षेला बसलेले विद्यार्थी ही परीक्षा साठी पात्र आहेत. परंतु अशातच मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा मुख्य परीक्षा 27 ते 29 मे या कालावधीत आहेत तर आयोगामार्फत अराजपत्रित गट- क ही परीक्षा 1 जून दरम्यान आहे. यासह केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी पूर्व परीक्षा 25 मे ला आहे. या सर्व परीक्षा पूर्वनियोजित आहेत. असे असताना शिक्षक भरतीसाठी होणारी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही परीक्षा देखील याच कालावधीत आहे. याचा फटका शेकडो उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे. शिक्षक भरती सह इच्छुक असणारे असंख्य उमेदवार इतरही परीक्षा देत असतात. त्यामुळे शिक्षक भरती सह अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांना प्रश्न पडला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता एक महिना परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सिद्धांत पुणेकर यांनी राज्य शासनाकडे केली.
राज्य परीक्षा परिषदेने टेट परीक्षेच्या अर्ज भरताना त्यात उमेदवार अन्य परीक्षा देत असतील तर त्यांचे प्रवेश पत्र अपलोड करण्यात यावी असे सांगितले आहे. त्यासाठी 14 मे पर्यंतचे मुदतवाढ दिली आहे, परंतु मुळातच स्पर्धा परीक्षांचे प्रवेश पत्र हे परिक्षेचे सात दिवसा अगोदर उपलब्ध होते. असे असताना हे उमेदवार प्रवेश पत्र कसे अपलोड करणार यांचा विचार परीक्षा परिषदेने केलेला नाही. परिणामी उमेदवारानी कुठलेही परीक्षेला न मुकता नुकसान होणार नाही याकरिता टेट परीक्षा एक महिने पुढे ढकलण्यात यावी जेणेकरून विद्यार्थ्यांना इतर सुद्धा परीक्षा देता येईल. अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सिद्धांत पुणेकर यांनी राज्य शासनाकडे केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here