जिल्हाधिकारी विनय गौडा जि.सी. यांना तसेच आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांचे विशेष कार्य अधिकारी मुर्लीनाथ वाडेकर यांच्याकरवी निवेदन सादर
तृप्ती चिद्रावार कार्यकारी संपादिका प्रबोधिनी न्युज – सावली – नुकतेच तहसीलदार सावली मार्फत प्रशासनास रेती उपलब्ध करून देण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते,रेती अभावी सावली तालुक्यातील ५४ ही ग्रामपंचायत स्तरावील संपूर्ण कामे ठप्प पडलेली आहेत,ग्रामपंचायतीकडे बांधकाम विभागाने तयार करून दिलेले अंदाजपत्रके तयार आहेत,मात्र रेती उपलब्ध नसल्यामुळे ग्रामपंचायती विकास कार्य करू शकत नाही,ही वास्तविकता आहे.मे महिना सुरु झाला आहे.त्वरीत रेती उपलब्ध करुन देण्याचा सरकारचा सरकुलर आहे,पुढील जुन महिन्यात पावसाळ्याला सुरवात होणार आहे.तेव्हा विकास कामे करायची कशी ? असा प्रश्न ग्रामपंचायत प्रशासनापुढे पडलेला आहे,सदर समस्येची महती लक्ष्यात घेऊन आज सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जि.सी. यांना तसेच आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री डॉ.अशोक उईके यांचे विशेष कार्य अधिकारी मुर्लीनाथ वाडेकर यांच्याकरवी रेती उपलब्ध करून देण्यासंदर्भात निवेदन दिले आहे.
चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जि.सी.यांनी लवकरात लवकर रेती उपलब्ध करून देण्याचे आश्वासन उपस्थित शिष्टमंडळाला दिले तसेच केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय (भारत सरकार) यांचेकडील दि. २८ मार्च, २०२० च्या अधिसूचनेतील APPENDIX-IX मधील अनुक्रमांक ४ च्या तरतुदीनुसार निश्चित वाळू गट तसेच, पर्यावरण अनुमतीप्राप्त वाळू गटांपैकी जे वाळू गट लिलावामध्ये गेलेले नाहीत अशा वाळूगटामधून शासनाच्या विविध घरकूल योजनांच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांकरीता स्वामित्वधन न आकारता कमाल ५ ब्रासपर्यंत वाळू उपलब्ध करुन देण्यात यावी.०८.०४.२०२५ च्या शासन निर्णयामध्ये व दिनांक 30/4/2025 च्या शासन निर्णयात नमूद केलेल्या कार्यपद्धतीनुसार ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करुन द्यावी असे नमूद होते.ऑनलाईन पद्धत वेळकाढू असल्याने लाभार्थीना रेती मिळण्यास विलंब होईल अशी भूमिका शिष्टमडळाने जिल्हाधिकारी यांचें समोर ठेवली.त्यात जिल्हाधिकारी विनय गौडा जि.सी.यांनी, तहसीलदार यांच्याकडे तालुक्यातील रेती संबंधित सर्वोच्च अधिकारी दिले असून तहसीलदार ऑनलाईन पासेसचा निर्णय घेतील, परंतु ओनलाइन पासेस पद्धत वेळखाऊ असल्याने ऑफलाईन पद्धतीने पासेस तहसीलदार उपलब्ध करून देतील असे सांगितले.
प्रधानमंत्री आवास योजना व इतर योजनांचा माध्यमातून सावली शहरात व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात घरकुल बांधकामे मंजूर झालेली आहेत.मात्र रेती अभावी सामान्य नागरिकांची घरे अर्धवट आहेत.काही घरकुलांचे कामे ठप्प पडलेली आहेत.परंतु आज जिल्हाधिकारी विनय गौडा जि.सी.यांनी आश्वासन दिल्यामुळे घरकुल धारकांना दिलासा मिळाला आहे.निवेदन देताना सरपंच संघटनेचे अध्यक्ष पुरषोत्तम चुदरी,युवा काँग्रेस तालुका अध्यक्ष किशोर कारडे,बोथलीचे उपसरपंच व जेष्ठ पदाधिकारी नरेश पाटील गड्डमवार,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक व चकपिरंजीचे उपसरपंच अरविंद भैसारे,ग्राम काँग्रेस कमिटी मोखाळ्याचे अध्यक्ष अनिल म्हशाखेत्री,युवा कार्यकर्ते राहुल चुनारकर,हेमंत सोमनकर, रवी भांडेकर आदी उपस्थित होते.

