प्रशांत देशापांडे ब्युरो चीफ प्रबोधिनी न्युज नेटवर्क – यवतमाळ – अखिल भारतीय महिला संवैधानिक हक्क परीषदेच्या राज्याध्यक्ष मा.मनिषा तिरणकर एकनिष्ठा फाऊंडेशन खामगाव, महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय पुरस्कार २०२५ नी सन्मानानी सन्मानित करण्यात आल्या.
हा कारेक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तर प्रदेश मधील सोनभद्र जिल्ह्यातील दुध्दीनगर येथील नगरपरिषद मैदानावर दिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला होता.या सन्मान सोहळ्यात आपल्या महाराष्ट्रासहित देशविदेशातील लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यात महाराष्ट्रातून मा.अ.भा.महिला संवैधानिक हक्क परिषदेच्या राज्याध्यक्ष मा.मनिषा तिरणकर, यवतमाळ,शुभम शमी,अभय तेलतुंबडे, शिर्डी उपस्थित होते.
हा सोहळ्याचे अध्यक्ष कमलेश मोहन हे होते.
प्रमुख पाहुणे आमदार भुपेश चौबे, सोनभद्र, श्रवण सिंह गोंड हे प्रमुखांनी उपस्थित होते. मनिषा तिरणकर यांचे वेगवेगळ्या क्षेत्रातील कार्याची दखल घेत गोल्ड मेडल,ट्राफी आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रमाणपत्र देऊन त्यांचा सोहळ्याचे अध्यक्ष, कमलेश मोहन, एकनिष्ठा गौ सेवा रक्त सेवा संस्थापक अध्यक्ष सुरजभय्या यादव, आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान करण्यात आला विशेष करून हे क्षेत्र आदिवासी बहुल क्षेत्र म्हणून ओळखले जाते.
हा सन्मान मिळाल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

