शिवसेना उबाठा गटाच्या नगरसेविका आशाताई जाधव यांचे पती निरधारी जाधव यांची आत्महत्या
महागाव तालुक्यातील अनंतवाडी शिवारात घेतला गळफास
श्रीक्षेत्र माहूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – उद्धवसेनेचे माहूर शहराध्यक्ष निरर्धारी जाधव यांनी गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सायंकाळी यवतमाळ जिल्ह्यातील अनंतवाडी ता. महागाव परिसरात उघडकीस आली.
माहूर शिवसेना उबाठा गटाचे शहराध्यक्ष निरर्धारी ज्ञानेश्वर जाधव (वय ५१, रा. आबासाहेब पारवेकर नगर, माहूर) हे महागाव तालुक्यातील अनंतवाडी शेतशिवारामध्ये झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळून आले. महागाव पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह सवना ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्याकरिता पाठविला.
तपास अंमलदार संतोष जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, महागाव तालुक्यातील आनंतवाडी शेतशिवारातील एका लिंबाच्या झाडाला निरर्धारी जाधव यांचा मृतदेह फाशी घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळून आलेला आहे. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून, पुढील तपास करण्यात येत आहे. जाधव यांनी फाशी का घेतली याचे कारण अद्याप कळालेले नाही.
निर्धारी जाधव हे उद्धवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांच्या आत्महत्येची वार्ता समजताच उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ज्योतिबा दादा खराटे माहूरचे नगराध्यक्ष फिरोज भाई दोसानी माहूर तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी महागाव येथे घटनास्थळी धाव घेतली होती त्यांच्या मृत्यूने माहूर व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांचेवर माहूर येथील मातृ तीर्थ समशान भूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांचे पक्षात आई पत्नी एक मुलगा आणि एक मुलगी आहे नगरसेविका आशाताई जाधव यांचे ते पती होत अंत्यविधीस मोठया संख्येने नेते कार्यकर्ते समाज बांधव तसेच नागरिक उपस्थित होते.

