बारावी बोर्ड परीक्षेत शास्त्री महाविद्यालयाचे घवघवीत यश

0
3

महाविद्यालयाचा एकूण ९५ टक्के निकाल

धर्माबाद प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी बोर्ड परीक्षेत धर्माबाद येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाने गतवर्षी प्रमाणे याहीवर्षी परंपरा कायम राखत रघवघवीत यश संपादन केले असून या वर्षीचा महाविद्यालयाचा एकूण ९५ टक्के इतका निकाल लागला आहे.
सविस्तर वृत्त असे की,फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी बोर्ड परीक्षेत धर्माबाद येथील लाल लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाने घवघवीत यश संपादन केले असून महाविद्यालयाचा एकूण निकाल ९५ टक्के असून ज्यात विज्ञान शाखेचा एकूण निकाल ९६ टक्के तर कला शाखेचा निकाल ९३ टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ९४ टक्के इतका लागला असुन विज्ञान या शाखेतून बन्नाळीकर धनया हेमत हिने ८६.३३ टक्के गुण मिळवून प्रथम,कदम श्रद्धा श्रीकांत ८०.३३ टक्के गुण मिळवून द्वितीय तर आडेकर महेश मल्लू ह्याने ७९.८३ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे.
तर कला या शाखेतून दासटवार मंजुषा जयबाबू हिने ७९.३३ टक्के गुण मिळवून प्रथम, शेवाळे प्रगती गणपत ७६ ६७ टक्के गुण मिळवून द्वितीय तर मदनुरे ऋतुजा पिराजी हिने ७४.०० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे
वाणिज्य या शाखेतून हिवराळे अनुष्का मारोती हिने ८५.१७ टक्के गुण मिळवून प्रथम, शंकरोड रमाकांत काशिनाथ ८३.०० टक्के गुण मिळवून द्वितीय,जंगलोड क्रोधाग्नी नरसय्या ८१.८३ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे.
सदरील महाविद्यालयाने मिळविलेल्या या यशाबद्दल धर्माबाद शिक्षण संस्थेचे सम्माननीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे मा.मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण, सचिव मा.डॉ.कमलकिशोर काकाणी, सहसचिव तथा उपाध्यक्ष मा.नागभूषण वर्णी,कोषाध्यक्ष महेंद्रकुमार पांडे,संचालक विश्वनाथ पाटील बन्नाळीकर,नागनाथ नोमुलवार,उमेशकुमार झवर,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कमलाकर कनसे, उपप्राचार्य डॉ. योगेश जोशी, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.अमृतराव वानखेडे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक इत्यादींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here