prabodhini news logo
Home चंद्रपूर तेंदूपत्ता संकलन करताना आणखी एका महिलेचा मृत्यू..

तेंदूपत्ता संकलन करताना आणखी एका महिलेचा मृत्यू..

0
302

परिसरात तिनं दिवसांत पाच महिलांचा मृत्यू..

मूल प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क : चंद्रपूर जिल्ह्यात तेंदूपत्ता संकलनास सुरुवात झाली असून जंगलालगतच्या गावातील नागरिक आपली रोजी रोटी भागविण्यासाठी वाघाची भीती असतांना देखीलतेंदुपत्तासंकलनासाठी जात असतात.
आज १२ मे २०२५ रोजी मूल तालुक्यातील भादुर्णी येथील महिला भुमिका दिपक भेंडारे (३०) मु. केवाडा (पेट) येथील असून भादुर्णी येथील भाऊजी गावतुरे यांची मुलगी आहे,ही सकाळी ८ वाजता तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेली असता जंगलात झुडुपांमध्ये असलेल्या वाघाने महिलेवर हल्ला करुन तिला जागीच ठार केले.

यापूर्वी सिंदेवाही तालुक्यातील तीन महिलांना व मूल तालुक्यातील एका महिलेला पट्टेदार वाघाने हमला करून ठार केले आहे. तसेच शिवापूर चक वन क्षेत्रात डोंगरगाव येथील चौधरी नामक शेतकऱ्याच्या बैलजोडीस हमला करून गंभीर जखमी केले आहे.

या सर्व घटना मागील चार -पाच दिवसातील घडलेल्या आहेत.त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आधीच मागील आठवड्यातील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे उन्हाळी धानाचे, मक्याचे आणि भाजीपाल्याचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी दुहेरी संकटात सापडलेला आहे.

वन विभागाने वन्यप्राणी व मानव यातील संघर्ष थांबावीण्यासाठी कायम उपाय योजना करावी. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here