पंचकुंडीय गायत्री महायज्ञ संपन्न
जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674
भंडारा – गायत्री परिवार मालेवार नगर आणि अखिल विश्व गायत्री परिवार युवा प्रकोष्ठ भंडारा यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रगती कॉलनी, मालेवार नगर येथील शिवमंदिर प्रांगणात दिव्य पंचकुंडीय गायत्री महायज्ञ चे आयोजन करण्यात आले, येथील भक्तिपूर्ण वातावरणात राष्ट्रगौरव वाढवणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाप्रसंगी यशोदामाई, ललिता ताई, गायत्री शक्तिपीठाचे मुख्य व्यवस्थापकीय विश्वस्त मुकुंद भैरम, सहसचिव प्रकाश वाघ आणि युवा प्रकोष्ठ जिल्हा समन्वयक चेतन भैरम यांच्या हस्ते भारतीय आट्यापाट्या संघाची कर्णधार तथा सुवर्णपदक विजेता कु. प्राची चटप व रजत पदक विजेत्या नीलिमा मांढरे, श्रीमती वैशाली खराबे, मीनाक्षी मोटघरे या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आणि खेळाडूंनी खेळ व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा अनुभव आपल्या मनोगतात व्यक्त केले. या पवित्र यज्ञाच्या माध्यमातून ५१ नवीन कुटुंबे गायत्री परिवारांशी जोडली गेली आहेत.
याप्रसंगी यशोदामाई व ललिता यांनी आपल्या अमृततुल्य वाणीने उपस्थितांना अध्यात्मिक मार्गदर्शन केले. गायत्री मंत्र व संगीतमय वातावरणात भक्तिरस भरून मालेवार नगर दुमदुमले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप साठवणे व प्रास्ताविक प्रकाश धात्रक यांनी केले. तर उपस्थितांचे आभार पायल सौरभ दिवटे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवा प्रकोष्ठ सह संयोजक उमेश बडवाईक सह संदीप साठवणे, प्रितेश गायधने, सौरभ दिवटे, विवेक गायधने, मनीष शहारे, प्रकाश धात्रक, प्रेमलाल कटरे, गिरीश शहारे, अक्षय सेलोकर, प्रिया नासरे, गिरीश शहारे, विवेक गायधने, नीलिमा शहारे, डॉ. लक्षितवार, विपुल रायकवाड, दीपक मंदुरकर, दशरथ बोरकर, जितेश वैद्य, मनोहर शहारे, पायल सौरभ दिवटे, आचल विवेक गायधने, मीना दीपक मंदुरकर, वैशाली संदीप साठवणे व गायत्री परिवारातील युवा प्रकोष्ठ भंडाराच्या कार्यकर्त्यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाची सांगता महाप्रसाद वितरण करून करण्यात आली.

