नवनाथ उल्हारे कोपरगाव शहर प्रतिनिधी 7744022677 – कोपरगाव तालुक्यातील चाचनळी येथे दशरथ गांगुर्डे व त्यांचा सहपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने माणकेश्वर नगर मध्ये प्रथमच सप्तशृंगी मंदिराची स्थापना झालेली आहे. या मंदिराची स्थापना व यात्रा उत्सव तीन दिवसाच्या कार्यक्रमादरम्यान संपन्न झाला. शनिवार दिनांक 10 5 2025 रोजी सकाळी आठ ते पाच दरम्यान पोथी वाचन करण्यात आले. रविवार दिनांक 11 5 2025 रोजी सायंकाळी प्रथम गावातील मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून पूजा विधी करण्यात आली. व सात ते नऊ यावेळेस ह भ प शांताराम महाराज गाडेकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम झाला. या कीर्तनासाठी गावातील भाविक भक्तांची मोठ्या प्रकारे गर्दी झाली होती. खरोखरच या सु श्राव्य कीर्तनाने सप्तशृंगी माता भक्त मंत्रमुग्ध होऊन गेले.
सोमवार दिनांक 12 5 2025 रोजी सायंकाळी सात ते नऊ वा ह भ प बाबुराव महाराज चांदगुडे यांचे काल्याचे किर्तन झाले. व नंतर दहीहंडी फोडून महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. खरोखरच हा कार्यक्रम एक प्रेरणादायी ठरला आहेत. या कार्यक्रमासाठी समस्त ग्रामस्थ ज्ञानेश्वर भजनी मंडळ व महिला भजनी मंडळ चाचणी यांचा विशेष प्रकारे सहकार्य लाभले. या सप्तशृंगी माता यात्रा उत्सव यापुढेही असाच चालू ठेवू. असे मंदिराची स्थापना करणारे दशरथ गांगोडे व त्यांचा परिवार यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी चाचणी गावचे पहिले लोकनियुक्त सरपंच नानाभाऊ बनसोडे सचिन चांदगुडे काळे सहकारी साखर कारखाना संचालक मनीष गाडे संजीवनी साखर कारखाना कोपरगाव विनायक गाडे उपसरपंच राजेंद्र शिंदे राहुल चांदगुडे आदी ग्रामस्थ यांच्यावतीने देवीची मान सन्मान पूजा विधी करण्यात.

