लोखंडी पूल जनतेसाठी खुले करावे
व्यापारी संघटनेची स्थानिक प्रशासनाला चेतावणी अन्यथा तीव्र आंदोलन करणार
गणेश शेंडे शहर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज, घुग्घुस येथील समस्त व्यापारी बाधवातफै दिनांक 21/5/2025 ला मुख्याधिकारी नगरपरिषद व पोलीस स्टेशन ठाणेदार घुगुस यांना निवेदन देऊन विनंती करण्यात आली कि मागील दोन वर्षांपासून बँक ऑफ इंडिया जवळील डब्ल्यू ही एल ने बांधकाम केलेले लोखंडी पूल हे काही डाग डुगि व काम असल्यामुळे सदर पूल बंद करण्यात आले होते यामुळे या परिसरातील नागरिकांना सामान घेत असताना वस्तीत येत असताना पुष्कळ त्रास सहन करावा लागत होता याच्या व्यतिरिक्त राजीव रतन रेल्वे गेट असल्यामुळे त्या मार्गावरून सुद्धा इकडे येत असताना तासाने तास ट्रेन उभी राहते त्यामुळे सुद्धा नागरिकांना पुष्कळ त्रास सहन करावा लागत आहे व यामुळे येथील व्यापारावर सुद्धा उपासमारीची वेळ येत आहे व ऑनलाईन कोरोना व कुठलेही बंद असो सर्वप्रथम जर कोणाला त्रास होते तर तो व्यापाऱ्यांना होतो त्याचा व्यापार बंद राहते धंदा बंद राहते आणि व्यापारी नेहमी प्रशासनाला सहकार्य करते परंतु हे सहकार्य करत असताना आता व्यापाऱ्यावर उपासमारीची वेळ येत आहे म्हणून या संदर्भात शासन आणि प्रशासनाने लवकरात लवकर सदर पूल सुरू करावे अन्यथा येणाऱ्या 26 तारखेपासून येथील व्यापारी बांधव चर्चा करून आपली प्रतिष्ठाने बंद ठेवले व याची सर्वस्वी जबाबदारी शासन आणि प्रशासनाची राहील करिता आपण आम्हाला सहकार्य करावे.

