गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क : ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय जवानांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्याला व अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या वतीने बुधवार, २१ मे २०२५ रोजी सायंकाळी गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौक ते कारगिल चौक या मार्गावर भव्य तिरंगा रॅली चे आयोजन करण्यात आले.
ही तिरंगा रॅली म्हणजे शूर सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देणारी आणि जनमानसात एकात्मतेचा संदेश देणारी प्रेरणादायी घटना ठरेल असे मत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.
या रॅलीत खासदार डॉ. नामदेव जी किरसान, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, आमदार रामदासजी मसराम, माजी जि.प.उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष ऍड. विश्वजीत कोवासे, शहराध्यक्ष सतीश विधाते, काँग्रेस ज्येष्ठ नेते शंकरराव सालोटकर, प्रभाकर वासेकर, परसरामजी टिकले, पांडुरंग घोटेकर, हरबाजी मोरे, देवाजी सोनटक्के, तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे राजेंद्र बुल्ले, वसंत राऊत, प्रमोद भगत, प्रशांत कोराम, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, रोजगार सेल अध्यक्ष दामदेव मंडलवार, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे, शिक्षक सेल अध्यक्ष दत्तात्रय खरवडे, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, NSUI जिल्हाध्यक्ष निशांत वनमाळी, माजी जि प सदस्य कुसुम आलाम, माजी जी. प. सदस्य विनोद लेनगुरे, रमेश चौधरी, नेताजी गावतुरे, नितीन राऊत, दिवाकर निसार, अनिल कोठारे, दिलीप घोडाम, सुरेश भांडेकर, कारगिल स्मारक समिती अध्यक्ष उदय धकाते, ढीवरु मेश्राम, श्रीकांत काथोटे, नरेंद्र गजपुरे शालिक पत्रे रामभाऊ ननावरे, जितेंद्र मुनघाटे, सुरज मडावी, मनोज उंदीरवाडे, उमेश उईके, स्वप्निल बेहरे, जावेद खान, माजिद सय्यद, गौरव येनप्रेड्डीवार, विपुल एलटीवार, कुणाल ताजने, अपर्णाताई खेवले, रीता गोवर्धन, पूर्णिमा भडके, शालिनी पेंदाम, स्वप्निल ताडाम, राहुल भांडेकर, महेंद्र लटारे, राजेंद्र कुकडकर, दिगंबर धानोरकर, सुधीर बांबोळे, लालाजी सातपुते, हमराज हारगुडे, अंकुश मोगरकार, भूमेश्वर सिंगाडे, महेंद्र खरकाटे, रवींद्र राऊत, मुनेश्वर भरे, देवाभाऊ सहारे,दिवाकर कांबळे, सिद्धार्थ शेंडे,जे. मुप्पीडवार, कैलास गेडाम, पदभाकर बारसागडे, संघपाल खेवले, लालाजी म्हशाखेत्री, केदारनाथ सलोटे, यशवंत म्हशाखेत्री, आनंदराव भोयर, दीप बांबोळे,राजेश सोरते, राहुल मडावी, स्वप्नील ताडाम, शजेद कुकुडकार सहा इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने सहभागी झाले. या रॅलीच्या माध्यमातून देशभक्ती, ऐक्य आणि बलिदानाची भावना जनमानसात पोहोचविण्याचा एक सशक्त प्रयत्न करण्यात आला.

