सुविद्या बांबोडे विदर्भ संपादिका प्रबोधिनी न्युज – ऑल महाराष्ट्र सिलंबम असोसिएशन आणि चंद्रपूर जिल्हा मल्टिस्पोर्टस सिलंबम असोसिएशन, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने बल्लारपुर तालुका क्रीडा संकुल विसापूर येथे सिलंबम प्रशिक्षण घेण्यात आले.. त्यात ऑल महाराष्ट्र सिलंबम असोसिएशन चे अध्यक्ष मान. अत्तार सर उपस्थित होते. कोचेस आणि ट्रेनर यांनी सिलंबम चे विविध प्रकार आणि शालेय सिलंबम स्पर्धा चे नियम प्रत्यक्ष प्रॅक्टिकल करून समजावुन सांगितले.. यावेळी चंद्रपूर जिल्हा मल्टिस्पोर्टस सिलंबम असोसिएशन चे अध्यक्ष तथा ऑल महाराष्ट्र सिलंबम असोसिएशन चे सहसचिव मान. वाल्मिक खोब्रागडे, महाराष्ट्र सिलंबम असोसिएशन चे लेडी विंग च्या. अंजु वासनिक आणि लता खोब्रागडे, तसेच ऑल महाराष्ट्र सिलंबम असोसिएशन चे मॅनेजर करन नेवारे उपस्थित होते.. यावेळी समता सैनिक दलाच्या गायत्री रामटेके आणि वामन सरदार तसेच सैनिक उपस्थित होते.. या शिबिराचे आयोजन आणि नियोजन प्रा दुषंत नगराळे, कार्यकारी अध्यक्ष, ऑल महाराष्ट्र सिलंबम असोसिएशन तथा सचिव चंद्रपूर जिल्हा मल्टिस्पोर्टस सिलंबम असोसिएशन, चंद्रपूर यांनी केले. या शिबिरामध्ये जवळपास 57 प्रशिक्षणार्थींनी लाभ घेतला..

