विद्यार्थ्यांनी उज्वल भविष्यासाठी व्यसनाला दूर सारा – न्यायपूर्ती सुमित जोशी
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – बाबूपेठ महिला बचत गट तसेच रणरागिणी महिला नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाणे इयत्ता 10 वि व इयत्ता 12 वि मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच पालक व विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन असा दुहेरी कार्यक्रमाचे आयोजन बालाजी सभागृह बाबूपेठ येथे उत्साहपूर्ण वातावरणात विविध क्षेत्रातील नामवंत मान्यवराच्या उपस्थितीत संपन्न झाला
कार्यक्रमाचे उदघाटन न्यायधीश मा.सुमित जोशी यांचे शुभहस्ते झाले,कार्यक्रमाला विशेष अथिती म्हणून मा.संजय पवार उपविभागीय अधिकारी चंद्रपूर,मा. राजकुमार हिवारे प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,मा.नरेंद्र बोबडे राज्य पुरस्कार प्राप्त प्राचार्य ,मा.प्रीतीताई खातखेडे ,कार्यक्रमाच्या मुख्य आयोजक तथा बचत गटाच्या संस्थापक अध्यक्षा सौ चंदाताई वैरागडे यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला
,कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांनी क्रांतीज्योती सावीत्रिबाई फुले,राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन,दीप प्रज्वलन तथा माल्यार्पण करून,करण्यात आली,याप्रसंगी पाहुण्यांचे स्वागत शुभांगी कंदलवार, मंजू खनके, वैशाली कुणारपवार यांनी स्वागत गीतांनी केले. प्रास्ताविकेतून चंदाताई वैरागडे यांनी बचत गट तथा रणरागिणी पतसंस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत विविध सामाजिक उपक्रम राबवून चंद्रपूर जिल्ह्यात एक वेगळं अस्थित्व निर्माण केलं आहे मग ते रक्तदान शिबिर असो,वृक्षारोपण,रोगनिदान शिबीर,महिलांच्या नृत्य स्पर्धा, जयंती -पुण्यतिथी,आनंद मेळावा, कोरोना काळात एक घास मदतीचा, उन्हाळ्यात पाणपोई असे एक ना अनेक सामाजिक उपक्रम राबवित आहे,आमचा बचत गट पैसाच्या देवाण घेवाण साठी मुळीच स्थापन केला नसून महिलांना सक्षम आणि आत्मनिर्भय करण्यासाठी त्यांच्या मध्ये असलेल्या कला गुणांना वाव देण्यासाठी तसेच त्यांच्या अंगी असलेले कौशल्य विकसित करून स्वयंरोजगार निर्मिती साठी प्रोत्साहित करणे हाच एकमेव उद्देश आहे आज बचत गटाच्या माध्यमातून अनेकांच्या सांसारिक जीवनात आर्थिक सहकार्य करू शकले, यांचा मनस्वी आनंद माझ्यासह माझ्या बचत गटातील महिलांच्या चेहऱ्यावर दिसत आहे,यापुढेही असेच प्रामाणिक कार्य सुरू राहील असे मनोगतातून व्यक्त केले,
कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक सुमित जोशी यांनी PPT द्वारे मार्गदर्शन करताना लहान मुलांवरील अत्याचार, पोक्सो कायदा,बालविवाह,मोफत कायदेविषयक सल्ला, मुलांची व्यसनाधीनता,यामुळे होणारी शिक्षा यावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच आजची महिला हीच समाजाला योग्य दिशा देणारी असून महिलांवरील अत्याचाराला आळा घालण्यासाठी महिलांनी घाबरून न जाता निर्भयपणे मुकाबला केला पाहिजे, बचत गटाच्या माध्यमातून चंदाताई वैरागडे यांनी इतक मोठ महिलांच संघटन उभारले आहे यासाठी चंदाताई मनस्वी अभिनंदन केले. मा.संजय पवार,मा.राजकुमार हिवारे प्राचार्य नरेंद्र बोबडे यांनीही गुणवंत विद्यार्थी तसेच पालकांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले,मार्गदर्शकाचे मार्गदर्शन अतिशय महत्वाचं होतं,गुणवंतांनाचा सत्कार प्रसंगी इयत्ता 10 वि मध्ये 90% पेक्षा अधिक,तसेच इयत्ता 12 वि मध्ये 85% पेक्षा अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह,व बुक देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला बाबूपेठ महिला बचत गटाच्या पदाधिकारी व सदस्य, रणरागिणी महिला नागरी पतसंस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य ,गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक तसेच परिसरसतील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती,कार्यक्रमाचे संचालन मेघा धोटे यांनी तर आभार स्वातीताई जनबंधू यांनी मानले.

