मोफत मिळणार प्रशिक्षण, चाचणी परीक्षेचा निकाल जाहीर
सुविद्या बांबोडे विदर्भ संपादिका प्रबोधिनी न्युज – गरिब आणि गरजू विद्यार्थ्यांना एमपीएससी, पोलीस भरती, आर्मी भरती यांसारख्या स्पर्धा परिक्षांसाठी मोफत प्रशिक्षण देण्याचा अम्मा की पढ़ाई हा अभिनव उपक्रम आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे. या उपक्रमातील चाचणी परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, तीन हजार विद्यार्थ्यांपैकी 300 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
13 एप्रिल रोजी शहरातील चार परीक्षा केंद्रांवर ही चाचणी परिक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर 21 एप्रिल रोजी उत्तरतारीखा प्रसिद्ध करण्यात आली. 26 मे रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून, गुणवत्तानिहाय सिमारेषा निश्चित करण्यात आल्या होत्या. त्यानुसार निवडलेल्या 300 विद्यार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
जून महिन्यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांची प्रमाणपत्र पडताळणी करून प्रत्यक्ष प्रशिक्षणवर्ग सुरू करण्यात येणार आहेत. या वर्गांमध्ये तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन, मोफत अभ्यासिका, शैक्षणिक साहित्य, तसेच दर रविवारी अधिकाऱ्यांद्वारे विशेष मार्गदर्शन सत्र अशी सुविधा दिली जाणार आहे. या अभिनव उपक्रमामुळे आर्थिक अडचणींमुळे मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण मोफत प्रशिक्षण मिळणार असून, त्यांच्या प्रगतीच्या मार्गातील अडथळे दूर होणार आहेत.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी आपल्या अधिकारी होण्याच्या स्वप्नांना बळ देऊ शकणार आहेत. अम्मा की पढ़ाई उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देऊन सक्षम बनवण्याचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद ठरत आहे. अनेक विद्यार्थी फक्त आर्थिक अडचणींमुळे आपल्या स्वप्नांना गळा घालतात, त्यामुळे या उपक्रमाच्या माध्यमातून गरिब आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देऊन त्यांच्या आत्मविश्वासात आणि कौशल्यात वाढ करणे, हेच आमचे ध्येय आहे. असल्याची भावना आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली आहे. या पुढाकारामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थी आपल्या अधिकारी होण्याच्या स्वप्नांना बळ देऊ शकणार आहेत. अम्मा की पढ़ाई उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देऊन सक्षम बनवण्याचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद ठरत आहे.
गुणवत्ता निहाय गुणांची सीमारेषा सर्वसाधारण प्रवर्गासाठी 62 गुण , महिलांसाठी 58, बीपीएलसाठी 57, दिव्यांगांसाठी 32 आणि अनाथ विद्यार्थ्यांसाठी 21 गुण ठेवण्यात आली. यानुसार 300 विद्यार्थ्यांची अंतिम निवड झाली आहे.

