
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर – महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ अंतर्गत मंडळाकडे कामगार कल्याण निधी भरणाऱ्या लिंन नंबर धारक कामगार कर्मचाऱ्यांना सामाजिक, साहित्यिक,शैक्षणिक, क्रीडात्मक ,संघटन आदी क्षेत्रातील विशेष योगदानासाठी मंडळाकडून विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार दिला जातो तसेच विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार पूर्वीचा गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार मिळाल्यानंतर पुढील दहा वर्षात साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडात्मक,संघटक आदी क्षेत्रात योगदान देणाऱ्या कामगारास मंडळाकडून कामगार भूषण पुरस्कार दिला जातो. माहे डिसेंबर २०२४ पर्यंतच्या कालावधीत सामाजिक कार्य करणाऱ्या कामगारांना सन २०२४ या वर्षाचा विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार व कामगार भूषण पुरस्कार प्राप्त करण्याकरिता कामगार कर्मचाऱ्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर अर्जाची Link मंडळाच्या www.public.mlwb.in या वेबपोर्टलवर दिनांक. २८ एप्रिल ते २३ मे २०२५ हि तारिख होती. परंतु यामध्ये दि.१० जुन २०२५ पर्यन्त वाढविण्यात आली आहे.या कालावधीत खुली राहील .
संपूर्ण अर्ज तपशिलासह अनुक्रमणिका सहित आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज व फाईल मंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या पत्त्यावर दिनांक.५ जून २०२५ होती. परंतु यामध्ये वाढ करुण ती दि.२० जुन २०२५ सायंकाळी पाच वाजेपर्यंत पोहोच सादर करावी. स्व:हस्ताक्षरात भरून संपूर्ण अर्ज आणि सोबत तपशीला सह अनुक्रमनिका सह आवश्यक कागदपत्रे जोडून पुरस्कार अर्ज फाईल मंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या मा.कल्याण आयुक्त महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ मध्यवर्ती कार्यालय हुतात्मा बाबू गेणू मुबंई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग प्रभादेवी रेल्वे स्टेशन जवळ,मुंबई-४०००१३ पत्त्यावर दि. २० जुन २०२५ रोजी मुदतीत पाठविण्यात यावी अशी माहिती मंडळाच्या गट कार्यालय चंद्रपूर तर्फे देण्यात आली आहे.संपर्कासाठी दूरध्वनी क्र.०२२६९३२८११७ यावर किंवा जवळच्या गट कार्यालय, कामगार कल्याण केंद्राशी संपर्क करावा असे आवाहन देवराव कोंडेकर सहखजाणीस तथा जिल्हाध्यक्ष राज्य गुणवंत कामगार असोसिएशन तथा नितीन राव यांनी केले आहे.












