Home झरी मांगली येथे राष्ट्रमाता – राजमाता अहिल्याबाई होळकर यांची 300 वी जयंती साजरी

मांगली येथे राष्ट्रमाता – राजमाता अहिल्याबाई होळकर यांची 300 वी जयंती साजरी

0
116

झरी प्रतिनिधी संघर्ष भगत 8408051995 – मांगली येथील समस्त धनगर समाजाकडून लोकमाता आहिल्या बाई होळकर यांची जयंती मोठ्या उत्सवा ने दि ३१ मे २०२५ रोजी धनगर समाज भवनात पार पाडली, या जयंती कार्यकमाचे अध्यक्ष उपसरपंच श्याम सुंदर चामाटे तर प्रमुख पाहूणे विशाल गोरे, संजय चामाटे, विजय काकडे, श्रिकांत चामाटे अविनाश गोरे, सुरेशराव चामाटे इ व्यासपीठवर उपस्थित होते. प्रास्ताविक गोरे यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्यांनी राजमाता अहिल्या बाईनी 28वर्ष जनतेच्या कल्याना साठी जात पंथ धर्म विसरून कार्य केले त्यांच्या कार्याला इतिहासात तोड नाही अहिल्या धनगर समाज ची आण बाण आणि शान आहे असे प्रतिपादित केले.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन कु जान्हवी, उन्नती चामाटे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संकेत चामाटे अनूप चामाटे युगूल चामाटे सूजल चामाटे सुमित गोरे रोशन चामाटे आणि सुरज सातघरे यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here