माजी उपसरपंचाची गळफास घेऊन आत्महत्या

0
313

सद्य ते धर्मराव शाळा मध्ये शिक्षक या पदावर कार्यरत होते.

विवेक मिरालवार तालुका प्रतिनिधी अहेरी 8830554583 – अहेरी येथील तत्कालीन ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व शिक्षक सचिन पेदापल्लीवार (४४) यांनी घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. १७ जून रोजी रात्री ९ वाजता ही घटना समोर आली. आत्महत्येमागील कारण अस्पष्ट आहे.

अहेरीच्या प्रथम नगराध्यक्षा प्राजक्ता पेदापल्लीवार यांचे सचिन पेदापल्लीवार हे पती होत. प्राजक्ता यादेखील सध्या शिक्षिका म्हणून काम करतात. आष्टी येथील महाविद्यालयात पदव्युत्तर पदवीचे पेपर सुरू असल्याने त्या माहेरी कोनसरी येथे होत्या. घरी आई व सचिन हे दोघेच होते. १७ रोजी सायंकाळी पाच वाजता सचिन आपल्या खोलीत गेले. त्यानंतर ते बाहेर आलेच नाही. रात्री ९ वाजता ते घरात पंख्याला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आले. आईने पाहिल्यावर हा प्रकार निदर्शनास आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here