prabodhini news logo
Home गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यातील व शहरातील समस्या तात्काळ सोडवा

गडचिरोली जिल्ह्यातील व शहरातील समस्या तात्काळ सोडवा

0
145

एमआयएम पक्षाची मागणी

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – गडचिरोली जिल्हयातील शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करण्यात यावे.
वयोवृद्ध शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करावी.
सरकारी कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन देण्यात यावे.
गडचिरोली जिल्ह्यात सुरजागढ लोहप्रकल्प, कोंसरी लोहप्रकल्प, हेडरी लोह प्रकल्प किंवा इतर कोणत्याही येणाऱ्या कंपन्या मध्ये गडचिरोलीतील स्थानिक बेरोजगारांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे.
निवृत्त झालेले कर्मचारी यांना रुजू करतांना कोणताही भेदभाव न करता सरसकट अबकड श्रेणी चे रुजू कऱण्यात यावे.
वनविभाग कडून वन्यप्राण्यांचे तात्काळ बंदोबस्त करण्यात यावे
शहरातील फूटपाथ दुकानदारांना हॅकर्स झोन उभारण्यात यावा
अतिक्रमणं धारकांना जागेचे पट्टे देण्यात यावे.
नगरपरिषद तर्फे नवीन भूखंड धारकांना आणि अतिक्रमणं धारकांना घरटॅक्स लागू करण्यात यावे.
गडचिरोली शहरातील धूनी, भांडी करणाऱ्या महिलांना रोजगार उपलब्ध करण्यात यावा
संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेचा मानधन तिन हजार रुपये कऱण्यात यावे
वरील सर्व मागण्या तात्काळ सोडविण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा एमआयएम पक्षाचे जिल्हा अध्यक्ष बाशिद शेख, युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष दिलीप बांबाळे, महिला जिल्हा अध्यक्ष आयशा अली सय्यद, किरणं सहारे, सोशल मीडिया प्रमुख जावेद शेख, जिल्हा महासचिव मुकेश डोंगरे, युवा आघाडी शहर अध्यक्ष मुन्ना रामटेके, महबुब मलिक, राकेश वेस्कडे, शहबाज शेख, सलाम शेख, रामराव खंडारे, इरफान सैफी, रेहान शेख, जिशान शेख, आदि उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here