prabodhini news logo
Home चंद्रपूर स्वतंत्र युवा संस्था खैरगावच्या वतीने गुणवंतांचा सन्मान

स्वतंत्र युवा संस्था खैरगावच्या वतीने गुणवंतांचा सन्मान

0
162

नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज, चंद्रपूर – स्वतंत्र युवा संस्था खैरगांव, चंद्रपूर यांच्या वतीने दि.२६ जून २०२५ ला समाज मंदिर खैरगाव (चांदसुर्ला) येथे राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंतीच्या निमित्त गावातील गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा घेण्यात आला.
या कार्यक्रमाला अध्यक्षा म्हणून माधुरी सागोरे सरपंच ग्रामपंचायत विचोडा (रै),प्रमुख मार्गदर्शक अनिल डोंगरे उपसरपंच ग्रामपंचायत विचोडा (रै). तसेच प्रमुख पाहूणे अर्जुनभाऊ नागरकार माजी सरपंच विचोडा (रै), संगीता हेलवडे ग्रामपंचायत सदस्य विचोडा (रै), जयेंद्र ताजने अध्यक्ष शाळा समिति, शंकरराव ताजने पुलिस पाटील खैरगांव, अरुणजी दैवलकर तंटामुक्ति अध्यक्ष खैरगाव,गुरुदास कातकर सामाजिक कार्यकर्ते,प्रतिभाताई पत्रकार यांची उपस्थिती होती. छत्रपति श्री. शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांचा फोटोला माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. संगिताताई हेलवडे यांनी आपल्या मार्गदर्शनातुन कस शिक्षण घ्यायला पाहीजे हे त्यांनी स्वत:च्या शिक्षणाच्या माध्यमातुन सागितले,व अभिजीत अलोने स्वतंत्र युवा संस्था (सदस्य)यांनी शिक्षणासंबंधी राजश्री शाहू महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर या थोर महान पुरुषांचे शिक्षणाप्रती त्यांची काय विचार शैली होती समजून सांगितले तसेच गुरुदासजी कातकर यांनी राजश्री शाहू महाराज यांच्या जीवणावर मार्गदर्शन केले तसेच मार्गदर्शक अनिलभाऊ डोंगरे यांनी थोर महान पुरुषांच्या जय घोषात मार्गदर्शनाला सुरुवात केली व विद्यार्थ्यांना गुणवंत म्हणजे काय हे थोडक्यात समजून सांगितले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षा माधुरी सागोरे यांनी पुर्वीच्या शिक्षणात व आत्ताच्या शिक्षणात कसा फरक आहे ते थोडक्यात विद्यार्थ्यांना सांगितले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .या गुणगौरव सोहळ्यात कु.कनक भोयर हीने इयत्ता १२वी मध्ये ७६% तसेच हर्शदा ताजने हीने इयत्ता १० वी मध्ये ९०%, प्राची हेलवडे ७६ %, साहील दर्वेकर ७५%, खुशी पहाणपट्टे ७५%, कु.सानिया टेकाम ७४%, कु.तणुजा आत्राम ७१%, गायत्री उमरे ७१%, कीर्ती अलोने ७१% विशेष गुणांनी उत्तीर्ण त्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला तसेच Hitech Library ची मागणी मंचावर उपस्थित मान्यवरांना केली आणि ही योजना प्रत्येक गावामध्ये असायला पाहीजे,कारण चंद्रपुर तालुक्यातील काही प्रभागातील विद्यार्थ्यांना धोक्याचे वळन घेत तालुका येथे अभ्यासासाठी जाव लागते व काही विद्यार्थी आर्थिक परीस्थिती मुळे वंचित राहते असा त्यांनी विचार व्यक्त केला.यावेळी स्वतंत्र युवा संस्था,खैरगाव, चंद्रपुर नेहमी समाज प्रबोधनात्मक, विशेष,संदेशनात्मक,कार्यशाळा, तरुण पिढीचा खेळामध्ये उत्साह वाढण्यासाठी नेहमी Sports Game, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येते,या कार्याला बघुन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वतंत्र युवा संस्था,खैरगावचे सर्व पदाधिकारी यांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.भाग्यश्री बापुराव झोडे सदस्य स्वतंत्र युवा संस्था यांनी केले तर प्रतिक मसराम यांनी मानले.
यशस्वी आयोजनाकरिता स्वतंत्र युवा संस्था खैरगाव चंद्रपुर संस्थापक अध्यक्ष प्रतिक मसराम, उपाध्यक्ष सुरज पारशिवे, सचिव उमेश लाखे, सहसचिव कुणाल क्षीरसागर, कोषाध्यक्ष शैलेश जाधव,सदस्य सुमित पारशिवे, ओम परसुटकर, आदीत्य रायपुरे, अभीजित अलोने,प्रितम रामटेके, कुणाल अलोने, भाग्यवान झोडे, साहील धुर्वे, साहील पारशिवे, साहील हेलवडे,उज्वला नेवारे, ॲड.भाग्यश्री झोडे, काजल मसराम, प्राची हेलवडे, सानिया टेकाम, अविका क्षीरसागर, वैष्णवी गिलबिले, प्राज्कता गिलबिले यांनी सहकार्य दिले असे देवराव कोंडेकर यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here