7 जुलै रोजी अर्ज सादर करण्याचे आवाहन
किशोर मडगूलवार जिल्हा संपादक, चंद्रपूर – दि. 2 : अल्पसंख्यांक समाजातील उमेदवारांना स्पर्धा परिक्षेमध्ये समान संधी प्राप्त होण्याच्या दृष्टीने संस्थेद्वारा प्रशिक्षण कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यासंदर्भात निवासी पोलिस भरती पुर्व प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरीता चंद्रपूर जिल्हयातील अल्पसंख्याक समाजातील प्रवर्गाकरीता जसे 1) मुस्लिम, 2) बौध्द 3) शीख 4) खिश्चन 5) जैन 6) पारशी या अल्पसंख्याक समाजातील इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी 7 जुलै रोजी सकाळी 11 वाजता चंद्रपूर जिल्हा मुख्यालयातील, पोलीस ग्राऊंड, येथे उपस्थित राहून अर्ज सादर करावेत.
प्रशिक्षणार्थी उमेदवारांच्या निवडीसाठी अटी व शर्ती : 1) प्रशिक्षणार्थीचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा जास्त नसावे. (तहसिलदार/नायब तहसिलदार यांचे उत्पन्न प्रमाणपत्रानुसार) 2) उमेदवार हा अल्पसंख्याक समाजातील मुस्लिम, बौध्द शिख ख्रिश्चन, जैन, पारशी असावा. 3) उमेदवार हा 18 ते 25 वर्ष वयोगटातील असावा. (मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत शासनाने वेळोवेळी ठरविलेल्या धोरणानुसार वयोमर्यादित सुट देय राहील.) 4) उमेदवारांची उंची पुरुष 165 सेंमी (छाती 79 सेंमी व फुगवून 84 सेमी.) महिला उमेदवारांसाठी उंची 155 सेंमी असावी. 6) शैक्षणिक पात्रता 12 वी पास असावा व सर्व कागदपत्रे आणणे आवश्यक आहे. 6) उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. 7) उमेदवार शारिरिकदृष्ट्या निरोगी व सक्षम असावा. 😎 रहिवासी दाखला व ओळखत्राची सत्यप्रत देणे आवश्यक राहील. 9) सदर योजनेंतर्गत प्रशिक्षणाचा कालावधी 3 महिन्यांचा निवासी राहिल, असे सहायक जिल्हा नियोजन अधिकारी यांनी कळविले आहे.

