पिंपळवनाचा नववा वर्धापन दिन उत्साहात साजरा

0
52

ब्ल्यु मिशन मल्टिपरपज पब्लिक ट्रस्ट, चंद्रपूरचा उपक्रम पर्यावरण रक्षणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

तृप्ती चिद्रावार कार्यकारी संपादिका प्रबोधिनी न्यूज चंद्रपुर – आज दिनांक 1 जुलै 2025 रोजी, ब्ल्यु मिशन मल्टिपरपज पब्लिक ट्रस्ट, चंद्रपूर निर्मित पिंपळवनाला आठ वर्षे पूर्ण होऊन नवव्या वर्षात पदार्पण करण्यात आले. बाबुपेठ येथील पिंपळवन परिसरात नववा वर्धापन दिन भदंत सुमनवन्नो महास्थवीर आणि भिक्खु संघ यांच्या हस्ते अत्यंत मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला.

चंद्रपूर हे प्रचंड प्रदूषण आणि तीव्र उष्णतेसाठी ओळखले जाणारे शहर आहे. अशा स्थितीत पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी व प्राणवायूचा (ऑक्सिजन) पुरवठा वाढविण्यासाठी पिंपळवन या अभिनव उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. हे वन म्हणजे पर्यावरण साक्षरतेचे आणि सामाजिक भानाचे जिवंत उदाहरण ठरले आहे.

या उपक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. दुशांत नगराळे असून, ब्ल्यु मिशन ट्रस्टच्या अध्यक्षा मान. अल्का मोटघरे, प्रगती मेश्राम (केंद्रीय शिक्षिका, भारतीय बौद्ध महासभा), प्रबोधिनी न्यूजच्या विदर्भ संपादिका सुविद्या बांबोळे, प्रबोधिनी न्यूज चे मुख्य संपादक प्रशांत रामटेके यांच्यासह परिसरातील अनेक उपासक आणि उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा वर्धापन दिन केवळ एक सोहळा नसून, पर्यावरण संवर्धनासाठीचा सातत्यपूर्ण प्रयत्न आणि लोकसहभागाचे प्रतिक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here