घुगुस शहरामध्ये मच्छर व कीटकांचे प्रमाण वाढल्यामुळे परिसरात लवकरात लवकर फवारणी करावी

0
148

संत श्री साईबाबा बहुद्देशीय संस्थेची मागणी

गणेश शेंडे घूगूस 9764890809 – घुग्घुस – 7 जून पासून पावसाळा सुरू झाला आहे त्यामुळे घुगुस व परिसरात नाल्या डबके खड्डे हे पाण्याने तुडुंब भरले आहे व या परिसरात ठिकठिकाणी कचरा जमा झाला आहे. त्यामुळे ठीक ठिकाणी दुर्गंधी पसरत आहे म्हणून नागरिक सुद्धा त्रस्त झाले आहे कचऱ्यामुळे व पाण्यामुळे येथील नागरिकांना डेंगू चे व कीटकांचे प्रमाण वाढत आहे त्याकरिता आज दिनांक 2/7/2025 रोज बुधवार ला संत श्री साईबाबा बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने व नागरिकांच्या वतीने नगरपरिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आले. त्यामध्ये संस्थेचे अध्यक्ष गणेश शेंडे, उपाध्यक्ष गणेश वजे पंकज बावणे, शंकर कामतवार, सचिन बोंडे या सर्वांनी प्रशासनाला निवेदन दिले व सूचना केली की आपण पावसाळा सुरू असल्यामुळे या परिसरात भविष्यात कोणतीही मोठी बिमारी किंवा आजार होऊ शकतो त्यासाठी डेंगू मलेरिया कीटकांचे प्रमाण या ठिकाणी वाढत आहे म्हणून प्रशासनाने ठिकठिकाणी व तसेच नाल्यांमध्ये जंतू नाशक पावडर टाकावे व ठीक ठिकाणी फवारणी यंत्रणेद्वारे फवारणी करण्यात यावी जेणेकरून पावसाच्या कुठल्याही बिमारीला येथील नागरिकांना सामोरे जावे लागणार नाही व परिसर स्वच्छ करण्यात यावा अशी समस्त नागरिकांतर्फे नगरपरिषद प्रशासनाला पत्र देऊन विनंती करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here