लॉईडस् मेटल, घुग्घुसच्या सीएसआर उपक्रमांतर्गत नकोडा येथे व्हीलचेअर व आधार काठीचे वाटप

0
69

नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – नकोडा (ता. चंद्रपूर) – लॉईडस् मेटल, घुग्घुस यांच्या सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) उपक्रमांतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत व्हीलचेअर व आधार काठी वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्री गोयल साहेब, विद्या पाल – सिएसआर प्रमुख, ग्रामपंचायत नकोडा सरपंच किरण बांदुरकर, उपसरपंच मंगेश राजगडकर, कृषी कोवे तालाचंदर अनुराग मते, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान ब्रिजभूषण पाझारे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “लॉईडस् मेटल, घुग्घुस च्या सीएसआर उपक्रमाच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम गावपातळीवर राबवले जात आहेत. अशा उपक्रमांमुळे अनेक गरजू नागरिकांना थेट लाभ मिळतो असून, हा उपक्रम जनकल्याणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे ज्येष्ठ नागरिकांनी आपला आनंद व्यक्त केला आणि लाईट्स मेटल कंपनीचे तसेच सर्व आयोजकांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here