
गणेश शेंडे घूगूस 9764890809 – डॉक्टर सुरेश जी कोल्हे यांची दिनांक 2 जुलै 2025 रोजी घुगुस जिल्हा चंद्रपूर येथे 47 वर्ष रुग्णांची अविरत सेवा पूर्ण झाली ही मोठी आणि महत्त्वाची उपलब्ध आहे या काळात अनेक आजारी रुग्णांना सेवा मिळाली व त्यांचे जीवन सुधारले आणि रात्रंदिवस रुग्णसेवा सुरू केली यामध्ये सर्वात मोठे योगदान सरांनी कोरोना काळात रुग्णांना तपासणी करण्यास कोणी तयार होत नव्हते अशा वेळेस स्वतःच्या जीवाची कुटुंबाची परवा न करता रात्रंदिवस कोरोना रुग्णाची अविरत सेवा सुरू ठेवली व रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा हा व्रत घेऊन ते रुग्णांची सेवा करीत होते त्यांच्या सेवेचा ध्यास घेऊन आज सरांची मुले हे सुद्धा वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत झाली त्यामध्ये डॉक्टर ऋषिकेश कोल्हे एमबीबीएस एमडी मेडिसिन हे सुद्धा सरांच्या पावलावरती पाऊल ठेवून रुग्ण सेवा हीच समाजसेवा हीच ईश्वरसेवा समजून कार्य करत आहे त्यांच्या या कार्यास समस्त घुगुस्वासीय जनतेतर्फे अभिनंदन याचा वर्षाव होत आहे व ईश्वर त्यांना अशाच अविरत रुग्णसेवा करत राहो हीच सर्व जनतेतर्फे त्यांच्यासाठी प्रार्थना व शूभेच्छा..















