prabodhini news logo
Home ठाणे प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजचा लेख – सुगंध मातीचा

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजचा लेख – सुगंध मातीचा

0
102

म्हणतात ना लहानपणीचा काळ सुखाचा, ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात असलेले माझा अंदाड नावाचं आदर्श गाव, जेमतेम हजार वस्ती असलेले गाव, गावा शेजारून
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणाची भातसा नदी.
शनिवारच्या अर्धा दिवसाची शाळा सुटल्यानंतर आम्ही सारे सवंगडी
नदीवर पोहायला जायचो. नदीच्या दोन्ही काठांना मोठे मोठे खडक असायचे, त्यामुळे नदीच्या पलीकडील गावातील महिलावर्ग
तसेच अलीकडच्या आमच्या गावातील महिलावर्ग , कपडे धुण्यासाठी नदीवर यायच्या, शनिवार आणि रविवारी मोठी जत्रा नदीवर भरलेली असायची, काय तो अवर्णनीय आनंद, नदीचा झुळझुळ वाहणारा प्रवाह, सारं काही मनाला प्रसन्न करणारे, मुंबईतील सिमेन्स कंपनीने आमचा आदर्श गाव दत्तक घेतलेलं होतं, त्यामुळे शनिवारी मुंबईचे डॉक्टर खास आमच्या गावात येत असत.गावातील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, शिक्षणासाठी आणि राहण्यासाठी, अंदाड या गावातून शहापूर तालुक्याच्या ठिकाणी राहायला आलो.
शिक्षण पूर्ण झाले नोकरीला लागलो
लग्न झाले मुले झाली. पण तो गावाच्या मातीचा सुगंध, अजूनही मला लहानपणाच्या आनंदात घेऊन जातो. जे कामाच्या व्यापातून कधी फुरसत मिळते, तेव्हा तेव्हा त्या आनंदी क्षणाची मला अंदरला गेल्यावर आठवण येते.
मला माझ्या गावातील,, माझ्या जन्मभूमीतील तो मायेचा ममतेचा
मला घडवणाऱ्या गुरुजनांचा, गावकऱ्यांचा, माझे जीवन घडविण्यामध्ये, माझ्या अंधारच्या मातीचा सुगंध कायम मनात वसलेला आहे. मी याबद्दल कायमचा ऋणी आहे. त्या सुगंधी मातीचा मी कायम शतशः आभारी आहे.

लेखक मनोज रामचंद्र गायकवाड
शहापूर जिल्हा ठाणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here