
सुगंध मातीचा जेव्हा
दरवळतो माझ्या मनात
सुखाचे अत्तर शिंपडूनी
आनंद पसरवतो जीवनात
सुगंध मातीचा जीवनी
धुंद करून सोडतो
जगाचा विसर पडून
तुझ्याशी नाते जुळवितो
सुगंध मातीचा मोहक
हुरहुर लावतो मनाला
प्रीतीची कळी उमलून
सुखावितो आर्त जीवाला
सुगंध मातीचा जीवनी
मना देतो नवी उभारी
आशेचे पंख लावून
मन घेई उंच भरारी
सुगंध मातीचा वाढवे
स्प॔दन माझ्या काळजाचे
रोमरोमात सामावले आहे
अस्तित्त्व सख्या सजणाचे
सुगंध मातीचा असे
आस माझ्या जगण्याची
मनाच्या परडीत फुलवितो
बाग रंगबेर॔गी स्वप्नांची
डाॅ. रेखा पौडवाल
गोवा















