
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – ओझर मिग येथे ‘किंग ग्रुप’ च्या उद्घाटन सोहळा व इंदिरा गांधी चौक फलक नुतनीकरण कार्यक्रम दिनांक ८ जून २०२५ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.
इंदिरा गांधी चौक ची स्थापना १५ ऑगस्ट 1१९८४ रोजी करण्यात आली होती. या चौकाचे संस्थापक अध्यक्ष जाफर पठाण हे गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गरीब व गरजू नागरिकांसाठी विविध सामाजिक योजना राबवतात. त्यांनी राशन कार्ड वाटप, इंदिरा गांधी घरकुल योजना, इंदिरा गांधी पेन्शन योजना, संजय गांधी निराधार योजना, तसेच रोग निदान शिबिर व रक्तदाब तपासणी शिबिरे यशस्वीपणे आयोजित केली आहेत.
जाफर पठाण व अमीन पठाण हे प्रत्येक सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग घेतात आणि सातत्याने जनसेवेत योगदान देत आहेत.
४१ वर्षांनंतर, इंदिरा गांधी चौक फलकाचे नुतनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानिमित्ताने हा भव्य कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांमध्ये प्रदीप अहिरे, जाफर पठाण, विनोद जाधव, कांचनराज जाधव, दिलीप मंडलिक, जाकीर पठाण, श्यामराव उगले, बबलू सय्यद, दानिश पठाण, आसिफ पठाण, मोहसीन सय्यद, तोसिफ पठाण, सोनू शेख, सलीम मसूरी, समीर शेख, आवेद पठाण, मोनु शेख, नावेद पठाण, शाहिद सय्यद, लड्डू सय्यद, फैजान शेख, मयूर सरदार, अमीन पठाण, रेहान तंबोली यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडले.












