prabodhini news logo
Home ठळक बातम्या राज्यस्तरीय “नृत्यजीत पुरस्कार” सागर अंदनकर यांना प्रदान

राज्यस्तरीय “नृत्यजीत पुरस्कार” सागर अंदनकर यांना प्रदान

0
146

तृप्ती चिद्रावार कार्यकारी संपादिका प्रबोधिनी न्युज – पुणे : जनकल्याण बहुउद्देशीय फाउंडेशन, पुणे आणि आशुतोष डान्स स्टुडिओ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय कर्तृत्ववान पुरस्कार सन्मान सोहळा नुकताच अत्यंत उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमात सागर अंदनकर यांना “नृत्यजीत पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले.

आ. मेघराज राजे भोसले अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व नाट्य परिषद, पुणे शाखा मा. सुरेश कपडे, राष्ट्रपती शौर्य पदक विजेते, आयपीएस अधिकारी मा. शहाजी पाटील, डिप्टी कमिशनर पोलीस, तसेच अभिनेता आणि निर्माते मा. डॉ. अशोक नगरकर वरिष्ठ शास्त्रज्ञ व जॉइंट डायरेक्टर, डीआरडीओ, भारत सरकार कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मान्यवर उपस्थित होते.

या मान्यवरांच्या शुभहस्ते सागर अंदनकर यांना नृत्य क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी नृत्यजीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सन्मान त्यांच्यासाठी एक प्रेरणादायी क्षण ठरला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here