
स्त्रीचे रूप सुंदर मनोहर वाटते
दोन घराचा उद्धार करते
तिच्या सारख बाई पण कुठेही नाही
स्त्री मुळे घराची शोभा वाढते..
सहनशीलतेची मूर्ती स्त्री असते
ममतेची प्रेमाची छाया भरवते
वात्सल्याचा झरा तिच्यात दिसतो
वात्सल्याचा महिमा वरदान ठरते ..
सावित्रीने स्त्रियांना शिक्षणाचे वरदान दिले
जीवनात चुल व मूल सांभाळते
आकाशाला गवसणी घालते
सुखदुःखाची चटके सोचते..
अपमान वारंवार सहन करते
लेकराचा खूप सांभाळ करते
स्त्री जन्मा तुझी कहाणी कष्टाची असते
निस्वार्थ भावना पोटात ठेवते
स्त्रीचा नेहमी अभिमान वाटतो
समाजसेवेचा वसा घेते
कर्तुत्वाने पुढे सर्वांना नेते
झाशीची राणी लक्ष्मीबाई तूच वाटते..
सामर्थ्याची मूर्ती धैर्याची असते
सावित्री जिजाऊ रमाई दिसते
बहीण आई वहिनी आजी मावशी
आपला नाही आता सबला नारी वाटते..
प्रा. मन्नाडे रमा धनराज लातूर.















