
श्रावण मास
नभ सावळे
पाऊसधारा
रुपं आगळे
श्रावण ॠतू
थेंब पानात
हवा गारवा
हर्ष मनात
श्रावणसरी
कृपा देवाची
बाग फुलवे
रुक्ष मनाची
श्रावण येता
फुले शिवार
बळीराजाला
सौख्य अपार
श्रावणसरी
भरे सागर
निसर्ग लेणं
सुखआगर
श्रावण वर्षा
मनभावन
हिरवाईचे
नंदनवन
डाॅ. सौ. रेखा पौडवाल गोवा












