prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे आजची कविता – स्त्री जन्मा ही तुझी...

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे आजची कविता – स्त्री जन्मा ही तुझी कहाणी

0
118

जुन्या काळची स्री
ठेवत होती घराला बांधून
एकेक नातं ठेवत होती
आपुलकीच्या दोऱ्याने सांधुन

डोक्यावरचा पदर तिचा
ढळला नाही कधी
मोठ्यांचा आदर करायची
मान द्यायची आधी

दीर नणंदा जावा भावा
सगळे नांदायचे एका छताखाली
घरामध्ये मुलं बाळं
ओसरीवरती होती रडलेली

विभक्त कुटुंब दिसे आज
नाही कुणाचा कुणाला मेळ
संसार आज राहीला नाही
नात्यांची सगळी झाली भेळ

आजच्या मॉडर्न आईला
पदर कुठं राहीला नाही
पब आणि पार्ट्या करण्यात
वेळ तिचा जाई

स्त्री जन्मा ही तुझी कहाणी
नात्यांची तुला ओळख नाही
पती आणि मुलं पाहिजे
एवढंच तुला दिसते बाई

सौ सुनंदा बाळासाहेब वाळुंज ठाणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here