prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – श्रावण

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – श्रावण

0
104

किती निसर्ग फुलला

श्रावणाचा सण आला
किती निसर्ग फुलला
पावसाचा खेळ कसा
चिंब भिजवू लागला

शालू हिरवा नेसून
पृथ्वी आनंदे नटली
हात हातात घेऊन
जणू पावसा भेटली

निसर्गात धुके दाट
घाटमाथा बहरला
चोहीकडे हिरवळ
किती निसर्ग फुलला

श्रावणातील सोहोळा
मना आनंद वाटला
पाहुनिया स्वर्ग असा
किती निसर्ग फुलला

दरी डोंगर हिरवे
सुखावून जाती खूप
घाटातील ती वळणे
निसर्गाचे छान रूप

सौ मानसी बापट बंगलोर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here