
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – शांताई हिरकणी विसावा सोशल फाउंडेशन पुणे यांच्या वतीने पुरस्कारचे नियोजन पुणे येथे आयोजन करण्यात आले होते.
राजश्री संजय जाधव (कवयित्री, साहित्यिका, सामाजिक कार्यकर्त्या) या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक साहित्यिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करत आहेत. अनेक गरजु लोकांना नेहमी मदत करत असतात. अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी आर्थिक मदत करत असतात. अनेक अनाथ आश्रमांना भेट देऊन अन्नधान्याची व्यवस्था करत असत. तसेच अनेक विषयांवर कविता अनेक वर्षांपासून लिहीत आहेत. 300 हुन अधिक कविता, चारोळ्या त्यांनी लिहिलेले आहेत. तसेच अनेक कवी संमेलन, साहित्य संमेलन यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना शांताई हिरकणी विसावा सोशल फाउंडेशन पुणे यांच्या वतीने राजश्री संजय जाधव यांना भारत गौरव सन्मान पुरस्कार देऊन यांना शाल श्रीफळ सन्मानपत्र देऊन प्रमुख पाहुणे अभिनेते तेजश बर्वे यांच्या हस्ते सन्मानपूर्वक गौरविण्यात आले. हा कार्यक्रम पत्रकार भवन, नवी पेठ, गांजवे चौक, पुणे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.















