prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – नागपंचमी

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – नागपंचमी

0
100

आली आली नागपंचमी
श्रावणातील पहिला सण
बायका मुलींचा उत्सव
वारूळं आमची धन

चिंब भिजवणारा पाऊस
मन रिजवणारा सण
पोरी बाईंच्या किंकाळ्या
पावसामध्ये नाच गाणं

नागराजाची पूजा
शेतकऱ्यांचा मित्र
सुवासिणींचा भाऊ
बिळं मोकळी होतात सर्वत्र

झाडाला झोका बांधला
कुणी घरी कायमचा फिक्स
घेऊ झोका ऊंच
सगळ्या पोरी बाळी मिक्स..

हिरवाईने नटला परिसर
आली पिके बहरात..
करा देवतांचे अधिष्ठान
व्रत वैकल्ये जोरात..

भक्ती केंजळे
सोमेश्वर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here