prabodhini news logo
Home चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्य़ातील अवैध देशी दारू गांजा व अवैध धंदे बंद करा –...

चंद्रपूर जिल्ह्य़ातील अवैध देशी दारू गांजा व अवैध धंदे बंद करा – आजाद समाज पार्टी

0
560

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर जिल्ह्य़ातील अवैध देशी दारू, गांजा व अवैध धंदे बंद करून संबंधित विक्रेतावर कठोर कारवाई करणेबाबत. तसेच दारु, गांजा आधीन असलेल्या बेरोजगार युवकांना रोजगार विषयी मार्गदर्शन करणेबाबत.
आज दिनांक 29 जुलै 2025 रोजी पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. हे निवेदनाची प्रत विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आली.
आजाद समाज पार्टी विदर्भ सचिव सुरेश मल्हारी पाईकराव यांनी मागणी करतात सांगितले की चंद्रपूर जिल्ह्य़ामध्ये सध्या बिनधास्त सर्रासपणे देशी दारू विक्री, गांजा, तसेच इतर अमली पदार्थाचे अवैध धंदे सुरू आहेत. यामुळे जिल्हयातील बेरोजगार युवक पिढी चुकीच्या मार्गाकडे वळत असून, सामाजिक व मानसिक स्तरावर जिल्हामध्ये अस्थिरता निर्माण होत आहे.
अनेक युवक बेरोजगारीचा अभावामुळे या चुकीच्या मार्गावर गेले असून त्यांना योग्य मार्गदर्शनाची व संधीची गरज आहे. यामुळे आपल्या पोलीस प्रशासनाने केवळ या अवैध धंद्यांवर कारवाई करणे पुरेसे नसुन , या युवकांना मार्गदर्शनाची सुध्दा आवश्यकता आहे.
आपल्या माध्यमातून असा एक नवीन उपक्रम सुरू करण्यात यावा जनेकरुन येणाऱ्या युवा पिढीला योग्य मार्गदर्शन लाभेल व ते आपल्या स्वः हिताचा, परिवाराचा व देशाचा भविष्यात त्याचा लाभ होईल.
सामाजिक जबाबदारी म्हणून मी सुरेश मल्हारी पाईकराव आझाद समाज पार्टीच्या वतीने पोलीस अधीक्षक यांना मागणी करुन खालील प्रमाणे प्रमुख मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्यात. असे देखील सांगितले

1. चंद्रपूर जिल्ह्य़ातील देशी दारू विक्री, गांजा व अन्य अमलीपदार्थ अवैध धंद्यांवर तात्काळ बंदी करण्यात यावी.
2. अवैध धंद्ये करणार्‍या व्यक्तींवर कठोर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
3. पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्तरित्या या युवकांना कौशल्य प्रशिक्षणावर मार्गदर्शन करुन रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात मदत करावी .
4. CSR योजनांतर्गत, स्थानिक कंपन्यांमध्ये किंवा इतर औद्योगिक प्रकल्पांमध्ये नशेच्या आहारी पडलेल्या बेरोजगार युवकांना शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगार मिळवून देण्यासाठी स्थानिक कंपनीशी चर्चा करून रोजगाराची व्यवस्था करण्यात यावी.
5. चंद्रपूर जिल्ह्य़ामध्ये दारु मुक्त, गांजा मुक्तीचा जनजागृती मोहिमा राबवून आहारी असलेल्या बेरोजगार युवकांना मार्गदर्शन करुन योग्य मार्गावर लावण्याचे एक पावुल आपण सुध्दा उचलावीत.
असे देखील पोलीस प्रशासन विभागाला या निवेदनाद्वारे सांगण्यात आले.
या गंभीर विषयाची तात्काळ दखल घेऊन योग्य ती सकारात्मक कारवाई करावी,
अशी मागणी करण्यात आली.
यावेळेस आजाद समाज पार्टी विदर्भ सचिव सुरेश मल्हारी पाईकराव, चंद्रपूर जिल्हा महासचिव रिताताई देशकर रमेश चापले प्रितीताई आवडे, तालुका अध्यक्ष आकाश चिवंडे, संकेत आवळे प्रशांत आवळे नागशेन कुरेकर, बबन वाघमारे वैशालीताई भालशंकर, आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here