prabodhini news logo
Home ठळक बातम्या श्री. प्रशांत ताराचंद रामटेके यांना ग्लोबल फॉउंडेशन च्या वतीने राज्यस्तरीय ग्लोबल स्टार...

श्री. प्रशांत ताराचंद रामटेके यांना ग्लोबल फॉउंडेशन च्या वतीने राज्यस्तरीय ग्लोबल स्टार 2025 हा पुरस्कार जाहीर

0
295

उषा पानसरे मुख्य कार्यकारी संपादिका प्रबोधिनी न्युज – विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या सहकार्याने श्री. प्रशांत ताराचंद रामटेके यांना ग्लोबल फॉउंडेशन च्या वतीने राज्यस्तरीय ग्लोबल स्टार 2025 हा पुरस्कार जाहीर झाला आहे, श्री. प्रशांत रामटेके हे एक ग्रामीण भागातून असले तरी त्यांनी शून्यातून विश्व् निर्मिती केली आहे, ते एक हाडाचे पत्रकार असून गोर गरीब जनतेला आपल्या पत्रकारितेतून निव्वळ न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न ते करत असतात समाजातीत छोट्या मोठया स्तरातील बातम्या, कोणाच्या अडचणी, कोणाची फसवणूक किंवा कोणाचा झालेला विजय याला प्रसिद्धी देण्याचं काम आणी समाजासाठी काहीतरी करण्याचं आणी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असल्याने पत्रकारिता हेच आपलं ध्येय समजून स्वतःला झोकून देऊन दिवस रात्र मेहनतीने समजतील वेगवेगळ्या घटकातील प्रत्येक बाजूला न्याय देण्याचं काम आदरणीय श्री. प्रशांत रामटेके अगदी मनापासून करतात, त्याचबरोबर साहित्यक्षेत्रात ही सरांची बाजू खूप भक्कम आहे मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये, लेखकांच्या लेखणीला वाव, प्रसिद्धी मिळावी व लेखकांचं सर्व स्तरातून कौतुक व्हावं यासाठी प्रशांत सर आपल्या पोर्टल मार्फत अतिशय कमी शुल्क घेऊन साहित्यिकांच साहित्य प्रसिद्धी करतात व त्यांना स्वतःची वेगळी ओळख तयार करून देतात.. अशा या होतकरू तरुण पत्रकारला त्यांच्या कामाचा आढावा घेऊन ग्लोबल फॉउंडेशन या संस्थेने दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 12 ते 3 या वेळेत ज्ञानज्योती सावित्री फुले स्मारक सभागृह पुणे येथे श्री. प्रशांत रामटेके यांचा सन्मान करण्याचे व त्यांच्या अतुलनीय कार्य,समाज प्रबोधन करून आपल्या कार्याचा जो प्रसंशसनीय ठसा उमटवला त्याचा कौतुक सोहळा पार पडणार आहे…
श्री. प्रशांत रामटेके यांना हा पुरस्कार जाहीर झाला त्यासाठी त्यांचे राजकीय, सामाजिक, सहित्यिक, शहरी व ग्रामीण सर्व स्तरातून कौतुक व शुभेच्छा वर्षाव होत आहे… व अभिनंदन या सुमणांची उधळण व सर्वांचे आशीर्वाद प्रशांत सरांच्या मस्तकी विराजमान होत आहेत… परत एकदा अभिनंदन प्रशांत सर..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here