
गोविंदांच्या धैर्याला मंच, परंपरेला प्रतिष्ठा, आणि तरुणाईला दिशा देणारा युवक काँग्रेसचा प्रेरणादायी पुढाकार – ब्रह्मपुरीत थरारक दहीहंडी उत्सव २०२५
रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज – ब्रह्मपुरीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात १८ ऑगस्ट ला सायंकाळी ५ वाजता युवक काँग्रेस ब्रह्मपुरी तर्फे दहीहंडी उत्सव २०२५ चे भव्य आयोजन करण्यात आले असून या उत्सवामुळे तरुणांमध्ये नवचैतन्य संचारत आहे. पारंपरिक उत्साह, सांस्कृतिक स्नेह व गोविंदांच्या साहसी खेळाचे दर्शन घडवणारा हा कार्यक्रम तरुणाईसाठी प्रेरणादायी आहे.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे गोविंदा पथकांना प्रोत्साहन देणारी पारितोषिके; प्रथम पारितोषिक ₹११११११/- व द्वितीय ₹५५५५५/- असे भरघोस बक्षीस देण्यात येणार असून, ब्रह्मपुरीतील सुप्रसिद्ध गगनाला गवसणी घालणाऱ्या गोविंदा पथकांचे अप्रतिम कौशल्य पाहण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.
गोविंदा खेळ हा केवळ करमणुकीचा कार्यक्रम नसून, संघटन, समन्वय, धैर्य, आणि साहसाचे अद्वितीय उदाहरण आहे. पथकातील प्रत्येक सदस्य अत्यंत कौशल्याने, शिस्तबद्ध पद्धतीने, आणि अपार मेहनतीने मानवी मनोरा तयार करतो. ही कसरत म्हणजे शारीरिक ताकद आणि मानसिक एकवटतेचे प्रतीक आहे. युवक काँग्रेसने हा सांस्कृतिक वारसा जपण्याचा आणि गोविंदांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.
कार्यक्रमात डीजे साउंडसह थरारक गोविंदा पथकांचे सादरीकरण, लाईटिंग आणि रंगीत सजावट, विशेष आकर्षण म्हणून गायन व मनोरंजनाचे कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आले आहेत, जे नागरिकांना आनंददायी अनुभव देतील.
या कार्यक्रमाला युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, महिला व तरुणवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, हा उत्सव उत्साह, परंपरा आणि सामाजिक सलोख्याचे प्रतीक ठरणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी व प्रवेशासाठी ८६००८६१७१७, ९३५६४१९४५२ या नंबर वर संपर्क साधावे.















