prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह साप्ताहिक उपक्रम आजची कविता – जळणाऱ्या वातीचा श्वास

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह साप्ताहिक उपक्रम आजची कविता – जळणाऱ्या वातीचा श्वास

0
100

दिव्या,दिव्या सांग मला
आपलं नातं खूप जुनं
एकमेकांची साथ आपली
आहे खुप पुर्वीपासून

तुझ्या संगतीत राहून
खुप काही शिकले
तुझा आधार होता
म्हणून आज टिकले

तुझं आपलं बरं आहे
एका जागी उभा
माझा मात्र वाऱ्याने
हलतो टेंभा

इकडुन तिकडुन येतो वारा
मला जीव नकोसा होतो
शहरामध्ये तर माझा
पंख्यानेच जीव जातो

कशीतरी जळत राहाते
स्वतःचा जीव वाचवते
पण वाऱ्याची एक झडप
जीव नकोसा करते.

सौ सुनंदा बाळासाहेब वाळुंज
ठाणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here