prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह साप्ताहिक उपक्रम आजची कविता – न दिसणारी वाट.

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह साप्ताहिक उपक्रम आजची कविता – न दिसणारी वाट.

0
146

शोध माणसा एकदा तरी
तुला न दिसणारी वाट
स्वत्वाचा शोध सोडून
व्यर्थ तुडवितोस डोंगर घाट।।1।।

भवसागर पार करण्या
आयुष्य लावलेस पणाला
असंख्य झेललेस घाव
हसू दाखवलेस जनाला।।2।।

सगे सोयरे नातीगोती
स्वार्थापायी तुझ्या भोवती
उलटे पडले फासे जेव्हा
कुणी न आले तुझ्या सोबती।।3।।

असेच का हो असते जीवन
प्रश्न मनाला पुन्हा सतावतो
दैवावरती ठेवूनी हवाला
संकटांना या दूर सारतो ।।4।।

कष्टातच दडलेली होती
न दिसणारी एक वाट
उमगले सत्य जेव्हा मला
लीलया पार अवघड घाट।।5।।

सौ. यादव उज्ज्वला राजेंद्र
भेकराईनगर, हडपसर, पुणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here