prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह साप्ताहिक उपक्रम आजची कविता – शांततेचा आवाज

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह साप्ताहिक उपक्रम आजची कविता – शांततेचा आवाज

0
100

शांततेच्या आवाजापुढे
शब्द होतात मुके
खूप काही सांगून जाते
शांततेपुढे शब्द झुके .||१||

शांततेत आहे ताकद
प्रवाही शब्दप्र्पात थांबती
अध्यात्मात मौन पाळता
सदगुरू होती सोबती.||२||

संसारी प्रेमळ भांडणात
पत्नीचा असहकार
वादळापूर्वीच्या शांततेमुळे
पती होतो निरुत्तर. ||३||

ऑपरेशन थिएटर बाहेर
शांतता करते सुन्न
डॉक्टरांच्या शब्दांसाठी
मन होते अती बेचैन. ||४||

कोर्टात निकालापूर्वी
पसरते अधीर शांतता
ही शांतता टाळते
अनेक वादंगता. ||५||

शांत ठिकाणी असे
लक्ष्मीचा निवास
शांतता हाच घराचा
दागिना आहे खास. ||६||

सौ. अंजली गरगटे
पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here