
कळत नाही मला स्वतःला सावरु का पसारा आवरु
मनाचे गुंते किती अन् कसे सोडवू का पसारा आवरु
तुझ्या काही गोष्टी, माझ्या काही तक्रारी कशा सोडवू
जीवास माझ्या लागे घोर , चिंता करु का पसारा आवरु
जग हे वाटे मज बंदी शाळा, स्वतःला त्यातून कसे सोडवू
नात्यांच्या घनदाट जंगलात सावरु स्वतःला का पसारा आवरु
देवा मज सांग नक्की कुणाचे नाव घेउन मना गुंतवू
नामस्मरण चित्ती तुझे नाम ओठी धरु का पसारा आवरु
देशाभिमान अंतरात जागृत आहे देशद्रोह्यांना जाब विचारु
पर्यावरण पुरक कामात झोकून देऊ का पसारा आवरु
नाताळाच्या माथी हाणू काठी व्रत हे हाती, कसे नाही म्हणू
स्वाभिमान जपून कणखर राहू , स्वत्व जपू का पसारा आवरु
गुंत्यात गुंते किती हे मनाचे, सगळेच मनाचे खेळ
ते खेळण्यात जीवन घालवू का पसारा आवरु
शेवटी सगळेच त्या जगनियंत्याच्या हाती, दोरीसवे वावरु
तोडून दोर स्वच्छंदी पक्षी सम नभी विहरू का पसारा आवरु
न संपणारी वाट ही जरी माहीत आहे संपवायची ठरवू
तरीही जमत नाही म्हणून चालत राहू की स्वतःला सावरु
(स्वरचित)
नीला चित्रे
चिंचवड पुणे














