prabodhini news logo
Home कारंजा प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह साप्ताहिक उपक्रम आजचा लेख – जळणाऱ्या वातीचा श्वास 

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह साप्ताहिक उपक्रम आजचा लेख – जळणाऱ्या वातीचा श्वास 

0
137

जळणारा दिवा हा घरातील असो किंवा देवाजवळील असो किंवा अन्यत्र कुठेही जळणारा असो त्याची जळण्याची पध्दत ही सारखीच असते. तो श्रीमंतीतील दिवा आहे. म्हणून त्याचा उर्जा स्तोत वेगळा आहे किंवा उजेड वेगळा आहे असे होत नाही जळणारा तो दिवाच असतो, तेलाचे प्रकार किवा नंदादीप चे प्रकार वेगवेगळे असु शकते . मग तो दिवा कुठल्याही प्रकारात येवो. त्याला फक्त जळणे आहे हेच त्याला माहिती असते. दिवा आहे म्हणून वातीचे अस्तित्व टिकून आहे परंतु दिवा आणि वात आहे म्हणजे त्यांना पुर्णत्व आलं असे होत. नाही त्या दोघांना जोडणारा दुवा असतो तो म्हणजे तेल किंवा तुप त्याशिवाय दिवा व वातीला पुर्णत्व येत नाही. दिवा -वात -तेल आणि त्याला ज्वालाग्राही
करणारा असते अग्नी, जोपर्यंत अग्नी वातीला पेटण्याची क्षमता देत नाही तोपर्यंत दिवा वात तेल हे सर्व एकमेकापासून अपूर्ण असतात .त्याचं कोणतही अस्तित्व पुर्णत्वास जाणे शक्य नाही हे ध्यानात घेतले पाहिजे. त्याच प्रमाणे मानवी जीवनाचे आहे. संसार थाटताना स्त्री पुरुष घर परिवार आणि समाज ….
दिवा ज्याप्रमाणे तेल,वात ,जळणे व भोवतीच्या वातावरणात तटस्थपणे सर्वाना सांभाळून आपले अस्तित्व स्विकारणे हे निर्जीव जिवाचे साम्य मानवात कळत नकळत रुजतात .
पुरूष हा दिव्याप्रमाणे तटस्थ असतो पण दिव्यासोबत तेल घेऊन जळणारी वात ज्या प्रमाने जळत असते त्यात जळणे जगाला दिसत, जळण्याची उपमा मिळते दिव्याची वात किती जळली , दिवा जळतो हेच सर्व म्हणतात. त्यात वात असते ,दिसते जळते पण जळताना ती मागे राहते, का? कुणास ठाऊक ; तसेच पुर्वी पासून पुरूषी अहंकारामागे किंवा मनुवादी वृत्तीमुळे म्हणा स्त्री अस्तित्व हे ना बरोबर गिणल्या जायचे सर्वाना माहीत आहे जगातील कुठलाही पुरूष हा स्त्रीविना अधूरा आहे. परंतु पुर्वी पासून स्त्रीला कमी लेखून पुरुषी अहंकाराने दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
स्त्री जिवन अनेकदा कठीण,संघर्षपूर्ण आणि त्यागानी भरले असते. जशी जळती वात सतत जळत राहते.
स्त्री व पुरूष एकमेकाचे पुरक आहे . स्त्री ही मृदृ , कोमल, माया देणारी तर पुरूष सशक्त बलवान
निसर्गाने स्त्रीला मातृत्वाची अनमोल देणगी दिली आहे संसार रथ चालवण्यासाठी दोन्ही महत्वाचे आहे. स्त्रीयाच्या मध्ये समर्पण भाव जन्मताच असते . स्त्रीकडे बिजधारणेचा गुण असल्याने तिला आदिशक्ती
म्हणून तिच्या मुर्ती बनवून मखरात बसवून तिची पुर्वी पूजा केली जायची . कालांतराने पुरुष सत्ताक पद्धती वाढत गेली…. एकीकडे तिची पूजा तर एकीकडे छळ व्हायला लागला असा दुटप्पीपणा वाढत गेला , हजारो वर्ष तीला अशिक्षित ठेवण्यात आले , पुरुष सत्तेने स्त्रीला कायम कमकुवत ठेवण्याचा प्रयत्न केला.
आताशा कुठे तिला कायद्याने हक्क मिळू लागले.
स्त्री ही सुशिक्षित झाली खरे पण आजही ती पाहिजे अशी सुरक्षित नाही, कधी गर्भात कधी हुंड्यासाठी मरते,कधी वांझ आहे म्हणून समाज मनातून उतरते तर कधी मुलीच आहे म्हणून मारल्या जाते. एखाद्या स्त्रीचा पती ऐन तारुण्यात मरते, तेव्हा तिच्या भावना समजून घेण्याऐवजी, सासरचे, नातेवाईक, समाज यांचा तिच्या कडे पाहण्याचा दृष्टिकोन कळत नकळत बदलते, म्हणजे तिने खुप मोठा गुन्हा केला की काय ? या भावनेतून समाजाची मानसिकता होते.
एखादा माणूस दारुड्या व्यसनी असला तर त्या बाईची अवस्था काय हे कोणी समजून घेत नाही उलट
तिलाच समजावण्याचा प्रयत्न करतात, की तो माणूस , मर्द आहे त्याने कसेही वागले तरी शेवटी तुझा पती आहे
तुला त्याच्या सारखे वागून जमणार नाही, मग कितीही चरित्रहीन असला तरी तो शेवटी पुरूष असतो. हेच मनावर रूजवल्या जाते. ती आयुष्यभर तिळतिळ जळून मरत राहते, तिच्या मनाची घालमेल, तिच्या
भावनेचे पंख नकळत समाज छाटत असतो, ती जळणारी वात जरी असली तरी तिने किती जळायचं यावर समाज मुग गिळून असतो.
कधी बलात्कार होते, तर कधी घरघुती हिंसाचाराला बळी पडते. स्त्री कडे भोगवस्तु म्हणून
पाहणाऱ्याची मानसिकता आज ही बदलेली नाही स्त्रीच्या अंगी ग्रहणशिलता , दुबळेपणा,असुरक्षितता मनात कायम दडलेला असते. ती आयुष्यभर बहीण, मुलगी,पत्नी ,आई म्हणून स्वतः ला घरसंसारात रूळवून मरत मरत जगते व जगतजगत मरते. तीच्या अस्तित्वाची ही कहाणी जळणाऱ्या वातीपेक्षा कमी नाही.
संसारात तिचं अस्तित्व प्रकर्षाने जाणवते , ती रात्रंदिवस कष्ट करून कुटुंबाचा डोलारा सांभाळते. मुलाबाळांना
त्याची झळ पोहचू देत नाही, कधी लेकराच्या सुखासाठी एकल जगणे ही पसंत करते, त्यावर बहिणाबाई चौधरी म्हणतात…..
अरे संसार संसार | नाही रडणं कुडनं
येड्या गळ्यातला हार | म्हणू नको रे लोळणं |
संसार कसाही असला तरी गळ्यातला हार मानून स्विकार करते. आज ती चुल मुल सांभाळून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे, ती सर्व आघाड्यांवर लढत आहे. असे असले तरी पुरूषी मानसिकता अद्याप बदलली नाही , आजही खुल्या मनाने मुलीच्या जन्माचे कुठेही स्वागत होताना दिसत नाही.
आज विज्ञान युग आले, स्त्री सुशिक्षित झाली तिला संविधानानुसार हक्क अधिकार मिळत आहे
ती मोठमोठे पद भूषवू लागली राष्टपती होण्यापासून तर चंद्रावर स्त्रीने स्वताचे स्थान निर्माण केले
खेळापासून तर सात समुद ती पार करेपर्यंत तीने मजल गाठली ती कुठेही कमी नाही पण ; ” जळणाऱ्या त्या वातीचा श्वास “
कोण्या ना कोण्या कारणाने घराघरात आजही घुटमळत आहे . त्या घुटमळलेल्या श्वासाची आगतिकता आजही समाज मनापर्यंत पोहचू शकत नाही ही मोठी शोकांतिका आहे….
त्यासाठी स्त्रीने घरात ,समाजात वावरताना काही गुण आत्मसात केले पाहिजे. मुक्त राहून चांगले विचार मनात ठेवले पाहिजे. तिच्यावर कोणाची वाईट नजर पडली तर आत्मनिर्भर होऊन धाडसाने तिला तोंड देता आले पाहिजे , स्त्रीयांनी तणावमुक्त राहण्यासाठी तीने आरोग्य जपले पाहिजे. मानसिक स्वास्थ्यासाठी चिंतामुक्त ,तनावमुक्त असेल तरच ती समस्येचा सामना करू शकेल. स्त्रीने स्वावलंबी बनावे स्वयंशिस्त आत्मनियत्रन हे गुण स्त्रीने आत्मसात करावेत तेव्हाच ती खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होईल. अन्यथा या ” जळणाऱ्या वातीचा श्वास ” मोकळा करण्यासाठी कोणीही पुढे येणार नाही. म्हणून स्त्री जातीला सांगु इच्छिते…….
येऊ दे तुझ्यावर कितीही संकटे
तु मनाने हो आता खंबीर
तुझ्यातील कर स्वाभिमान जागा
उभ्या पहाड पर्वतालाही तु चिर……

नंदा भगत /कारंजा लाड
जि वाशिम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here