prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह साप्ताहिक उपक्रम आजची कविता – जळणाऱ्या वातीचा श्वास

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह साप्ताहिक उपक्रम आजची कविता – जळणाऱ्या वातीचा श्वास

0
191

निशब्द शीतल वात
उकलते महान अर्थ
आघात कितीही यातनेचे
जळणे हा तिचा धर्म (१)

काळोखी रात्र जरी
करते अंधकारावर मात
देह झिजवी अविरत
देते प्रकाशाची साथ(२)

वादळ वारा पाऊस
करी प्रयत्न अडवण्याचा
तक्रार नाही कशाची
निर्धार सदा जळण्याचा(३)

कधी समजून घ्यावी
तिची जळण्याची जिद्द
प्रेरणा ती संयमाची
होई प्रत्येक वेळी सिद्ध (४)

वात छोटी जरी
किर्ती आहे मोठी
स्वतःचं दुःख विसरून
विश्वासाने राही पाठी(५)

दुसऱ्यांना दिला आधार
वंदन इवल्याश्या वातीला
मंद मंद श्वासातूनही
जन्म देई क्रांतीला (६)

डॉ.स्मिता गजभिये /तिरपुडे
लाखनी,जिल्हा.भंडारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here