prabodhini news logo
Home नाशिक प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह साप्ताहिक उपक्रम आजचा लेख – जळणाऱ्या वातीचा श्वास

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह साप्ताहिक उपक्रम आजचा लेख – जळणाऱ्या वातीचा श्वास

0
104

आतल्या आत धगधगते ती,
कोंडतोय तिचा श्वास,
अचानक गेला सोडून तो,
कसा बसेल विश्वास

सर्व काही सुरळीत चालू असताना, घरात गोकुळ नांदताना, कुठे काय चुकले आणि क्षुल्लक कारणावरून त्याने जीवनच संपवले,ती तर अचानक झालेल्या ह्या आघाताने कोलमडून पडली, दोन लेकरं त्यांनी कुणाच्या तोंडाकडे पहावे? भाऊबंदकी, भाऊ बहिणी असे कितीसे दुःख धरून बसणार,आज काल वेळ आहे का कुणाला? जो तो आपापल्या कामात व्यस्त आहे,पण ती मात्र एकटी पडली तिचे मन निगरगट्ट झाले,रडूही येत नाही, आतल्या आत कोसतेय स्वतःला,माझी काय चूक ?, ईतक्या कमी वयात वैधव्य आले, कशी काढू सर्व जीवन एकाकी, जणू एक दिव्यातील. “जळणाऱ्या वातीचा श्वास” कोंडतोय, बाहेर पडली तरी अनेक दुश:सन तयारच आहेत मांडीवर बसवून घ्यायला, आणि हो स्री च स्री ची दुश्मन आहे, विधवेला “वेगळी, अपमानास्पद” वागणूक द्यायला,पण ती हवा आली की वाती सारखी फडफडते, जोमाने पुन्हा पेटत रहाण्याचा प्रयत्न करते, आपल्या दोन लेकरांसाठी,त्यांचा आई आणि बाप बनण्याचा प्रयत्न करते…

सौ माधुरी नामदेव अमृतकार सटाणा, नासिक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here